​औपचारिक घोषणा झाली, स्टारकास्टही ठरली...पण आजपर्यंत बनू शकला नाही दिव्या भारतीच्या आयुष्यावरचा हा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 13:24 IST2018-04-05T07:54:32+5:302018-04-05T13:24:32+5:30

अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. १९९३ मध्ये आजच्याच दिवशी (५ एप्रिल) दिव्या भारतीने जगाचा निरोप घेतला. पण बॉलिवूड ...

A formal announcement was made, starcast was also done ... but it was not until today that this movie of Divya Bharati was done !! | ​औपचारिक घोषणा झाली, स्टारकास्टही ठरली...पण आजपर्यंत बनू शकला नाही दिव्या भारतीच्या आयुष्यावरचा हा चित्रपट!!

​औपचारिक घोषणा झाली, स्टारकास्टही ठरली...पण आजपर्यंत बनू शकला नाही दिव्या भारतीच्या आयुष्यावरचा हा चित्रपट!!

िनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. १९९३ मध्ये आजच्याच दिवशी (५ एप्रिल) दिव्या भारतीने जगाचा निरोप घेतला. पण बॉलिवूड प्रेमींच्या मनातून दिव्या भारती कधीच जाणारी नाही. १९९० मध्ये तेलगू चित्रपट ‘बोब्बिली राजा’मधून दिव्याने अभिनय कारकिर्द सुरूवात केली आणि १९९२ पर्यंत म्हणजे, उण्या पु-या दोन वर्षांत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनण्यापर्यंतचा अभूतपूर्व प्रवास पूर्ण केला. मृत्यूच्या आदल्या वर्षी म्हणजे १९९२ मध्ये दिव्याने एका पाठोपाठ एक असे तीन हिट सिनेमे दिलेत आणि १९९३ मध्ये आजच्या दिवशी अचानक तिच्या मृत्यूचीच बातमी आली. तिच्या मृत्यूच्या बातमीने प्रत्येकजण हळहळला. दिव्याचा मृत्यू का झाला, कसा झाला, हे रहस्य आज २५ वर्षांनंतरही उलगडलेले नाही. 



 मुंबईतील वर्सोवा परिसरातील पाचमजली इमारतीच्या टेरेसवरून पडून दिव्याचा झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. काहींच्या मते तिने आत्महत्या केली. तर काहींच्या मते तिची हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मात्र, ठोस पुरावे मिळाले नसल्याने १९९८ मध्ये या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली. त्यामुळे दिव्याच्या मृत्युबाबत लोकांच्या मनात संभ्रम कायम राहीला. दिव्याच्या मृत्युकडे संशयाने पाहणारे लोक तिचा कथित पती साजिद नाडियाडवाला याच्याकडे बोट करतात.  साजिद सोबतचे संबंध,कल्पनातीत यश अन् कुटूंबियांशी दूरावलेले संबंध आदी गोष्टींचा ताण सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे काही म्हणतात तर काही तिच्या मृत्यूचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी जोडतात.  पण दिव्याचा मृत्यु आजही एक रहस्यच राहिला आहे. तसाच तिच्या आयुष्यावरचा सिनेमा पाहण्याची चाहत्यांची इच्छाही अधुरी राहिली आहे.
 दिव्याच्या आयुष्यावर आधारित ‘लव बिहाइंड द बॉर्डर’ या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. यासाठी ग्रीक अभिनेत्री तैतियाना हिच्या नावाची घोषणाही करण्यात आली होती. पण हा चित्रपटही कधीच पडद्यावर आला नाही. 

ALSO READ : ​जाणून घ्या दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांची प्रेमकथा

Web Title: A formal announcement was made, starcast was also done ... but it was not until today that this movie of Divya Bharati was done !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.