तापसीचे बिग बींच्या पावलावर पाऊल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 19:09 IST2017-01-07T19:09:04+5:302017-01-07T19:09:04+5:30

२०१६ मध्ये ‘पिंक’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिने उत्कृष्ट अभिनय साकारला. आता ती २०१७ मध्ये तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित ...

Footage of Big B's footsteps! | तापसीचे बिग बींच्या पावलावर पाऊल !

तापसीचे बिग बींच्या पावलावर पाऊल !

१६ मध्ये ‘पिंक’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिने उत्कृष्ट अभिनय साकारला. आता ती २०१७ मध्ये तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी वर्षात तिचे जवळपास ६ चित्रपट रिलीज होणार आहेत. ‘नाम शबाना’,‘जुडवा २’ या चित्रपटांसाठी ती सध्या शूटिंग करते आहे.

एवढेच नाही तर तिला ’डब्ल्यूसीआरसी प्राइड वूमन अ‍ॅवॉर्ड’,‘जेएफडब्ल्यू अ‍ॅवॉर्ड’,‘रित्ज आयकॉन अ‍ॅवॉर्ड’ हे पुरस्कारही तिला मिळाले आहेत. अल्पशा कालावधीतच प्रसिद्ध झालेल्या तापसीला आता जाहिरातींचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, तिने अद्याप ते प्रस्ताव मान्य केलेले नाहीत. तिच्याकडे अशाही जाहिरातींचे प्रस्ताव आले आहेत. ज्यांच्या जाहिरातींसाठी बिग बी, करिना आणि कंगना यांनीही काम केले आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसी पन्नूकडे बाईक ब्रँड, हेअर आॅईल ब्रँड, फेस केयर ब्रँड यांचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, ती सध्या ‘सेल्फ केयर प्रॉडक्ट ब्रँड’ साठी शूटिंग करीत आहे. या जाहिरातीसाठी बिग बी, करिना, कंगना यांनी देखील याअगोदर शूटिंग केले आहे.  
फेबु्रवारीमध्ये ती कमर्शियल शुटिंग सुरू करणार आहे. 

Web Title: Footage of Big B's footsteps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.