रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा

By तेजल गावडे | Updated: November 12, 2020 10:58 IST2020-11-12T10:58:12+5:302020-11-12T10:58:35+5:30

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

This is the first time that Ranbir Kapoor has revealed about his relationship with Alia Bhatt | रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा

रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. आलिया आणि रणबीर दोन वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांसोबत आहेत. या नात्याविषयी आलियाने अनेकदा खुलासा केला आहे. पण, रणबीर कपूर तिच्यासोबतच्या या प्रेमाच्या नात्याविषयी पहिल्यांदा तेव्हा बोलला होता, जेव्हा त्यांच्या प्रेमाचा अकुंर नुकतेच बहरू लागला होता. 


असे सांगितले जाते की एका मुलाखतीत रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाला होता की, तिच्यासोबत असणारे नाते हे अगदी नवी आहे. त्याबाबत फार काही बोलायचे नाही. अतिशय खास अशा या नात्याला फुलण्यास, बहरण्यास वेळ देण्याची गरज असल्याची बाब त्याने पुढे सांगितली होती. 


आलियाचे त्याच्या जीवनात असणारे स्थान नेमके काय स्वरुपाचे आहे, यावरुनही त्याने पडदा उचलला होता. पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची भावना नेमकी कशी असते याबाबतही रणबीर या मुलाखतीत बोलला होता. नवी व्यक्ती, नवे स्वभाव, काही जुन्या गोष्टींमध्येही येणारं नाविण्य हे मुद्दे त्याने अधोरेखित केले होते. आपण या नात्यांकडे अतिशय सकारात्मक आणि संतुलित दृष्टीकोनातून पाहत असल्याचे त्याने सांगितले होते. 
आलिया भटच्या आधी रणबीर कपूर दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफसोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्यानंतर तो आलियासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे चाहते ते लग्न कधी करणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर व आलिया यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: This is the first time that Ranbir Kapoor has revealed about his relationship with Alia Bhatt