पहिली रेसिंग चॅम्पियन अलिशा आता आॅनस्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 16:19 IST2016-03-29T23:19:22+5:302016-03-29T16:19:22+5:30

भारतात खेळामध्ये विशेषत: क्रिकेटला अधिक प्राधान्य आहे. या व्यतिरिक्त इतर खेळांना फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु इतर खेळांमधील ...

First racing champion, Alisha, now has a screensaver | पहिली रेसिंग चॅम्पियन अलिशा आता आॅनस्क्रीन

पहिली रेसिंग चॅम्पियन अलिशा आता आॅनस्क्रीन

रतात खेळामध्ये विशेषत: क्रिकेटला अधिक प्राधान्य आहे. या व्यतिरिक्त इतर खेळांना फारसे महत्त्व दिले जात नाही. परंतु इतर खेळांमधील खेळाडूही काही कमी नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चेन्नई येथील तरुण मुलगी अलिशा अब्दुल्लाह रेसिंगमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर आता बाहेरही मोठी कामगिरी बजावण्यास सज्ज झाली आहे. अलिशाने गो-कार्टिंगमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी केली. तिचे वडील आर. ए. अब्दुल्लाह हे नावाजलेले रेसर आहेत.



वयाच्या ११ व्या वर्षी अलिशाने गो-कार्टिंगच्या साºया रेस जिंकल्या. वयाच्या १५ व्या वर्षी ती सुपर बाईक रेसिंगकडे वळाली. २००४ साली जे. के. टायर नॅशनल रेसिंग चॅम्पियशनशीपमध्ये ती पहिल्या पाचमध्ये आली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्याकडे अधिक लक्ष दिले. २०१० साली दुचाकीचा अत्यंत भयंकर अपघात झाल्यानंतर ती चार चाकीकडे वळाली.



याविषयी बोलताना अलिशा म्हणते, ‘हा सर्वथा पुरुषी खेळ आहे.  आपल्यासोबत एक मुलगी स्पर्धेला उतरत आहे, हे बºयाच जणांना पटत नव्हते. बºयाचवेळा ते मुद्दामहून माझ्या गाडीला धक्का देत. मी पुन्हा त्यांच्याशी लढायला तयार व्हायची. अपघातानंतर मी पुन्हा याकडे यायला तयार नव्हते. २०१४ साली तिने तमिळ चित्रपट इरुम्बु कुथिराई या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली. त्यानंतर भविष्यात तिला आणखी चांगली संधी आल्या. ‘तुमच्या मनात आल्यानंतर सारं काही होऊ शकतं. काही वेळा तुमची चेष्टा होऊ शकते, पण तुम्ही अधिक मजबुतीने पुढे येता, असे अलिशा आत्मविश्वासाने सांगते.

Web Title: First racing champion, Alisha, now has a screensaver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.