First Photos : ...अखेर करण जोहरने आपल्या जुळ्या मुलांना नेले घरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 17:45 IST2017-03-29T12:15:21+5:302017-03-29T17:45:21+5:30

बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहर याने आज त्याची जुळे मुले यश आणि रूही यांना हॉस्पिटलमधून घरी नेले आहे. जेव्हा करण ...

First Photos: ... Karan Johar took his twin boys home at the end !! | First Photos : ...अखेर करण जोहरने आपल्या जुळ्या मुलांना नेले घरी!!

First Photos : ...अखेर करण जोहरने आपल्या जुळ्या मुलांना नेले घरी!!

लिवूड फिल्ममेकर करण जोहर याने आज त्याची जुळे मुले यश आणि रूही यांना हॉस्पिटलमधून घरी नेले आहे. जेव्हा करण त्याच्या चिमुकल्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन जात होता, तेव्हा त्याचे काही फोटोज् कॅमेºयात कैद झाले आहेत. 



एका फोटोमध्ये करण त्याच्या एका मुलाला कड्यावर घेऊन जात आहे. तर इतर फोटोंमध्ये तो हॉस्पिटलमधून कारमध्ये बसताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी करणने ट्विट करून म्हटले होते की, लवकरच तो त्याच्या मुलांचे फोटोज् शेअर करणार आहे. योग्य वेळी तो त्याच्या मुलांची झलक त्याच्या फॅन्सला दाखविणार आहे. 



करणने त्याच्या आॅटोबायोग्राफी ‘अनसुटेबल बॉय’च्या लॉन्चिंगवेळी वडील बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने ट्विटवर सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांचा बाप बनल्याचे जाहीर केले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक नामांकित व्यक्तींनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. 



दरम्यान, करणच्या मुलांच्या प्रीबर्थ डिलिव्हरीमुळे डॉक्टरांनी त्यांना दोन आठवड्यांपेक्षा अधिक वेळ हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. चार दिवसांपूर्वीच करणने हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. त्याचबरोबर या महिन्याच्या अखेरपर्यंत मुलांना घरी घेऊन जाणार असल्याचे संकेतही दिले होते. त्यानुसार करणने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना घरी नेले आहे. 

Web Title: First Photos: ... Karan Johar took his twin boys home at the end !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.