First Look : ‘बॉर्डर’फेम जेपी दत्ता यांच्या ‘पलटन’चा पहा फर्स्ट लुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 18:46 IST2017-06-11T13:16:08+5:302017-06-11T18:46:08+5:30
भारतीय सैन्याच्या लढाऊ आणि धाडसी वृत्तीचे दर्शन घडविणाºया ‘बॉर्डर’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते जे. पी. दत्ता आता ...

First Look : ‘बॉर्डर’फेम जेपी दत्ता यांच्या ‘पलटन’चा पहा फर्स्ट लुक!
भ रतीय सैन्याच्या लढाऊ आणि धाडसी वृत्तीचे दर्शन घडविणाºया ‘बॉर्डर’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते जे. पी. दत्ता आता पुन्हा एकदा असाच काहीसा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘पलटन’ या चित्रपटाचा पहिला लुक रिलीज करण्यात आला असून, या चित्रपटालादेखील ऐतिहासिक धार दिल्याचे दिसून येत आहेत.
२००६ मध्ये आलेल्या ‘उमराव जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना दत्ता यांनी एका वक्तव्यात म्हटले होते की, ‘आता वेळ आलेली आहे की, प्रेक्षकांना नवी कथा ऐकविली जावी. मी ‘पलटन’ला प्रेक्षकांसमोर आणत आहे. हा चित्रपट आणि चित्रपटाचा विषय माझ्या खूप क्लोज आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी मी खूपच उत्साहित आहे.’ दरम्यान चित्रपटाच्या पहिल्या लुकमध्ये दाखविण्यात आले की, सैन्याची एक तुकडी एका विचित्र रस्त्यावरून मार्गक्रमण करीत आहे. या पोस्टरमध्ये ‘ब्रदर टू माय राइट, ब्रदर टू माय लेफ्ट! टुगेदर वी स्टॅण्ड, टुगेदर वी फाइट!’ अशी टॅगलाइनदेखील देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये सैन्यातील अधिकाºयांच्या नावाचे बिल्ले लटकलेले दिसत आहेत. सध्या दत्ता या चित्रपटासाठीची कलाकारांची निवड करीत असून, लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पलटन’मध्ये बरेचसे कलाकार दिसण्याची शक्यता आहे. जे. पी. फिल्म्सद्वारा निर्मित या चित्रपटाची शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे. तर २०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांत हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.
काही वर्षांपासून जे. पी. दत्ता यांनी बॉलिवूडपासून अंतर निर्माण केले होते. त्यांनी चित्रपटांवर काम करणे थांबविले होते. त्यामुळे बºयाचशा वर्षांनंतर पुनरागमन करीत असून, या चित्रपटात प्रेक्षकांना काहीतरी स्पेशल बघण्याची संधी मिळेल असेच काहीसे चित्र दिसत आहे.