'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:33 IST2020-09-15T19:32:25+5:302020-09-15T19:33:18+5:30
अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट हरामीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट हरामीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. त्याने फर्स्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात इमरान हाश्मी वेगळ्या अंदाजात दिसतो आहे. यात त्याचे मोठे केस, वाढलेली दाढी, डोळ्यावर चश्मा व गळ्यात सोन्याची चैन घातलेली दिसते आहे. इमरानच्या या लूकची सर्वत्र चर्चा होते आहे.
इमरान हाश्मीने हरामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिले की, हरामी फर्स्ट लूक. इमरान हाश्मीच्या लूकची सर्वत्र चर्चा होते आहे.
#Harami first look pic.twitter.com/dW7EGVDc3Y
— Emraan Hashmi (@emraanhashmi) September 14, 2020
अभिनेता सिद्धांत कपूरने लिहिले की,लव इट इम्मी. एका युजरने लिहिले, हा लूक आवडला. श्याम मदीराजू लिखित व दिग्दर्शित हरामी चित्रपटाची निर्मिती इंडो-अमेरिकक प्रोडक्शनची आहे. चित्रपटाची बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२०च्या मुख्य स्पर्धा विभागासाठी निवड झाली आहे.
याबद्दल इमरान हाश्मी म्हणाला की, या प्रोजेक्टसाठी मला श्याम यांची स्क्रीप्ट खूप आवडली. त्यांनी बारकाईने याची माहिती दिली होती. श्याम आणि हरामीच्या टीमला खूप शुभेच्छा. कारण चित्रपटाची बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२०साठी निवड झाली आहे.
या व्यतिरिक्त इमरानचा आगामी चित्रपट 'मुंबई सागा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चॉकलेट: डीप डार्क सीक्रेट', 'कलियुग', 'आवारापण, द किलर', 'दिल दिया है', 'गुड बॉय बॅड बॉय','आशिक बनाया आपने', 'अक्षर', 'गँगस्टर' आणि 'राज - द मिस्ट्री कंटिन्यु' याशिवाय त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे.