First Look : अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा लोगो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:37 IST2017-02-03T12:07:13+5:302017-02-03T17:37:13+5:30

एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रोडक्शनवरही स्वत:ची पकड मजबूत करीत आहे. तिने प्रोड्यूस केलेल्या तिच्या ...

First Look: Anushka Sharma's 'Fillori' logo was shared | First Look : अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा लोगो केला शेअर

First Look : अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चा लोगो केला शेअर

अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रोडक्शनवरही स्वत:ची पकड मजबूत करीत आहे. तिने प्रोड्यूस केलेल्या तिच्या दुसºया ‘फिलौरी’ या सिनेमाची पहिली झलक लोगोमधून बघावयास मिळाली आहे. या सिनेमाचा लोगो नुकताच शेअर करण्यात आला असून, सिनेमात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ आणि अभिनेता सूरज शर्मा झळकणार आहेत. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर रिलिज करण्यात येणार आहे. 



कॉमेडी, रोमॅण्टिक ड्रामा असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अंशाई लाल यांनी केले आहे. अनुष्काने प्रोड्यूस केलेला हा सिनेमा वेगळ्या धाटणीचा असेल यात काहीही शंका नाही. या अगोदरदेखील अनुष्का शर्मा हिच्या बॅनरअंतर्गत ‘एनएच-१०’ या कमी बजेट सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. शिवाय हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला होता. आता पुन्हा ती ‘फिलौरी’ सिनेमा घेऊन येत असून, त्याचा लोगो नुकताच रिलिज करण्यात आला आहे. या सिनेमाकडून तिला भरपूर अपेक्षा असून, प्रेक्षक हा सिनेमा पसंत करतील, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. 



गेल्या वर्षी अनुष्का सलमान खानबरोबर ‘सुलतान’ आणि करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमांमध्ये झळकली होती. दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरल्याने अनुष्का सध्या ‘सातवे आसमान’वर आहे. खरं तर बॉलिवूडमध्ये अनुष्काकडे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून बघितले जाते. तिन्ही खानबरोबर काम करण्याची तिला संधी मिळाली असून, त्यांच्याबरोबरचे सर्वच सिनेमे बॉक्स आॅफिसवर सुपरहिट राहिले आहेत. शिवाय ती क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळेही नेहमीच चर्चेत असल्याने प्रेक्षकांच्या ओठावर अनुष्काचे नेहमीच नाव असते. आता ती ‘फिलौरी’मधून काय करिष्मा दाखविणार हे बघणे मजेशीर ठरेल.  

Web Title: First Look: Anushka Sharma's 'Fillori' logo was shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.