​क्यूट हिनायासोबत हरभजनसिंह व गीताने साजरी केली पहिली ‘लोहडी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 11:26 IST2017-01-13T15:14:58+5:302017-01-14T11:26:59+5:30

harbhajan singh and geeta basra first lohri celebration with daughter hinaya heer :harbhajan singh and geeta basra : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह व गीता बसरा दोघेही मुलगी हिनाया हीर हिच्यासोबत पहिली ‘लोहडी’ साजरी करत आहेत.

The first 'Lohdi' celebrated by Harbhajan and song with a cute hina | ​क्यूट हिनायासोबत हरभजनसिंह व गीताने साजरी केली पहिली ‘लोहडी’!

​क्यूट हिनायासोबत हरभजनसिंह व गीताने साजरी केली पहिली ‘लोहडी’!

रतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह व गीता बसरा दोघेही मुलगी हिनाया हीर हिच्यासोबत पहिली ‘लोहडी’ साजरी करत आहेत. गतवर्षी हिनायाचा जन्म झाला. ‘लोहडी’च्या मुहूर्तावर गीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  एक सेल्फी पोस्ट केली आहे. यात हरभजन, गीता व हिनाया असे तिघेही दिसत आहे. गोड आणि हसºया चेहºयाची हिनाया मम्माच्या कुशीत बसलेली आहे आणि कॅमेºयाकडे बघते आहे.

या क्यूट फोटोला गीताने तेवढेच क्यूट कॅप्शनही दिले आहे. ‘Happy first Lohri to our life.. our heartbeat Hinaya Heer! May You always be protected by the Almighty &we wish you nothing but the best!’असे तिने लिहिले आहे. गीताने ही सेल्फी पोस्ट करताच उण्यापुºया तासाभरात चार हजारांवर लोकांनी त्यास लाईक केले. पन्नासावर लोकांनी या सेल्फीवर प्रतिक्रिया दिल्यात.



गतवर्षी २९ आक्टोबरला हरभजन व गीता विवाह बंधनात अडकले होते. गत पाच वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर एप्रिल महिन्यात गीता प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यादरम्यान आयपीएलवेळी गीता बेबी बम्पसोबत दिसली होती. २८ जुलैला हिनाराचा जन्म झाला होता. गत डिसेंबर महिन्यांत हरभजन व गीता पहिल्यांदा आपल्या मुलीसोबत अमृतसरच्या सुवर्णमंदिरात पोहोचले होेत. येथील गुरूद्वारात आशीर्वाद घेतल्यानंतरचा तिघांचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.



लोहडी हा उत्तर भारतातील प्रसिद्ध सण आहे. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला खुल्या मैदानात कुटुंबातील लोक आणि जवळचे आप्त शेकोटी पेटवून त्याभोवती एकत्र जमतात. लोहडी हा पंजाबी आणि हरियाणवी लोकांचा प्रमुख सण आहे.
गीताने सन २००६ मध्ये ‘दिल दिया है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘दी ट्रेन’, ‘सेकंड हसबेंड’ या चित्रपटातही ती दिसली होती. 


 

Web Title: The first 'Lohdi' celebrated by Harbhajan and song with a cute hina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.