८४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटात चार मिनिटांचा दाखविण्यात आला होता पहिला किसिंग सीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 16:56 IST2017-07-07T11:26:49+5:302017-07-07T16:56:49+5:30

बॉलिवूड चित्रपट आणि रोमान्स हे पूर्वांपार ठरलेले समीकरण आहे. कारण बॉलिवूडपटात रोमान्स नसेल तर तो चित्रपट अर्धवट असल्याची प्रेक्षकांना ...

The first Kissing Seen was shown four minutes before the film '84 years ago'. | ८४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटात चार मिनिटांचा दाखविण्यात आला होता पहिला किसिंग सीन!

८४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटात चार मिनिटांचा दाखविण्यात आला होता पहिला किसिंग सीन!

लिवूड चित्रपट आणि रोमान्स हे पूर्वांपार ठरलेले समीकरण आहे. कारण बॉलिवूडपटात रोमान्स नसेल तर तो चित्रपट अर्धवट असल्याची प्रेक्षकांना जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच हल्लीच्या चित्रपटात रोमान्स दर्शविण्यासाठी प्रचंड बोल्ड सीन्सचा भडीमार केला जातो. त्यामध्ये किसिंग सीन्स तर अगदीच सामान्य बाब आहे. वास्तविक किसिंग सीन्स आताचा ट्रेण्ड नसून, सुरुवातीपासूनच अशाप्रकारचे सीन्स दाखविले जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की, पूर्वी चित्रपटातील रोमान्स हा झाडामागे दाखविला जात होता. परंतु आम्ही तुम्हाला ८४ वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाचा दाखला देऊन पडद्यावरील रोमान्स हा तेव्हापासूनच बिनधास्तपणे दाखविला जात असल्याचे पटवून देणार आहोत. 
 
खरं तर ‘किसिंग सीन’ हा शब्द जरी कानावर पडला तरी, किसर बॉय इमरान हाश्मी याची आठवण होते. मात्र बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मी अगोदर अ‍ॅक्ट्रेस देविका राणी यांनी किस सीनला सुरुवात केली होती. काल ६ जुलैनिमित्त ‘वर्ल्ड किस डे’ सेलिब्रेट करण्यात आला. याकरिताच आम्ही बॉलिवूडमधील पहिल्या आॅनस्क्रीन किस सीनविषयी तुम्हाला सांगणार आहोत. १९३३ मध्ये आलेल्या ‘कर्मा’ या चित्रपटात देविका राणी आणि हिमांशू राय यांच्यात पहिला किस सीन दाखविण्यात आला होता. चार मिनिटांचा हा किस सीन चित्रपटातील रोमान्सचा एक भाग होता. 

या सीनमध्ये अभिनेता बेशुद्ध असून, अभिनेत्री त्याला शुद्धीवर आणण्यासाठी किस करताना दिसते. हिमांशू राय आणि देविका राणी वास्तविक जीवनात पती-पत्नी होते. मात्र अशातही पडद्यावर किस सीन देणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. परंतु हे धाडस हिमांशू राय आणि देविका राणी यांनी करून दाखविले होते. त्यावेळी त्यांच्या या किस सीनची प्रचंड चर्चा रंगली होती. 

Web Title: The first Kissing Seen was shown four minutes before the film '84 years ago'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.