​...अखेर ऐश्वर्याला पडली सलमानच्या मदतीची गरज??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:25 IST2016-06-21T11:55:56+5:302016-06-21T17:25:56+5:30

सलमान खान व ऐश्वर्या राय यांचा भूतकाळ सर्वांनाच माहित आहे. अर्थात आता हे दोघेही आपआपल्या आयुष्यात फार पुढे निघून ...

Finally, Salman needs help from Aishwarya? | ​...अखेर ऐश्वर्याला पडली सलमानच्या मदतीची गरज??

​...अखेर ऐश्वर्याला पडली सलमानच्या मदतीची गरज??

मान खान व ऐश्वर्या राय यांचा भूतकाळ सर्वांनाच माहित आहे. अर्थात आता हे दोघेही आपआपल्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहे. मात्र कुठल्याही निमित्ताने का असेना त्यांच्यातील कनेक्शन पुढे येते आणि मग सगळ्यांची उत्सूकता ताणली जाते. यावेळी आम्ही बोलतोय, ते ‘ये दिल है मुश्किल ’ आणि ‘सुल्तान’बाबत. या प्रकरणात अजय देवगण आणि करण जोहर यांचेही कनेक्शन आहे.  ‘ये दिल है मुश्किल’सोबत अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. यावरून करण व अजयमध्ये नाराजी वाढली असल्याची चर्चा आहे. पण येत्या काळात ही नाराजी आणखीच वाढण्याची शक्यता आहे आणि याचे कारण ‘सुल्तान’ आहे. ‘ये दिल मुश्किल’ आणि ‘शिवाय’ एकाच दिवशी म्हणजे २८ आक्टोबरला रिलीज होत आहे. तर ‘सुल्तान’ ईदला रिलीज होतो आहे. अशात अजय व करण दोघांनाही ‘सुल्तान’ची मदत हवी आहे. ‘सुल्तान’सोबत आपल्या चित्रपटाचे ट्रेलर दाखवले जावे, अशी अजय व करणची दोघांचीही इच्छा आहे.   हा ‘इनडायरेक्ट मार्केटींग’चा फंडा आहे. आता तुम्ही म्हणाल, येथे ऐश्वर्या व सलमानचे कनेक्शन कुठूल आले. तर तेच आम्ही सांगतोय..करणच्या ‘ये दिल मुश्किल’मध्ये रणबीर कपूर व अनुष्का शर्मासोबत ऐश्वर्या राय बच्चन ही सुद्ध आहे...आता समजले ना????

Web Title: Finally, Salman needs help from Aishwarya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.