अखेर झालाच खुलासा, म्हणून अक्कीने स्वीकारले होते कॅनडाचे नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:52 PM2020-05-11T15:52:57+5:302020-05-11T15:59:07+5:30

माझे 14 सिनेमा फ्लॉप झाले होते....

Finally revealed that Akki had accepted Canadian citizenship gda | अखेर झालाच खुलासा, म्हणून अक्कीने स्वीकारले होते कॅनडाचे नागरिकत्व

अखेर झालाच खुलासा, म्हणून अक्कीने स्वीकारले होते कॅनडाचे नागरिकत्व

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या थैमानात अक्षयने कुमार मदतीला धावून आला आहे. पीएम केअर पासून मुंबई पोलिसांच्या मदतीला खिलाडी कुमार धावून आला आहे.


आतापर्यंत अक्षयने अनेक देशभक्तीपर आधारित सिनेमांमध्ये काम केले आहे. ज्यात हॉलिडे, बेबी, रुस्तम, मिशन मंगलसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. आपल्या सिनेमांना घेऊन अक्षय नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या कॅनडाच्या नागरिकत्वावर टीका करण्यात येत होती.

 काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार आपली को-स्टार करीना कपूरसोबत पोहोचला होता. यावेळी अक्षयने या मुद्दयावर खुली चर्चा केली. अक्षयला या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आले की, ''जेव्हा तू देशभक्ती आणि जवानांबाबत बोलतोस त्यावेळी नेहमीच तुला कॅनडाच्या नागरिकत्वावर टार्गेट केले जाते यावेळी तुला काय वाटते ? यावेळी अक्षय म्हणाला, आजतकच्या रिपोर्टनुसार एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार आपली को-स्टार करीना कपूरसोबत पोहोचला होता. यावेळी अक्षयने या मुद्दयावर खुली चर्चा केली. अक्षयला या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आले की, ''जेव्हा तू देशभक्ती आणि जवानांबाबत बोलतोस त्यावेळी नेहमीच तुला कॅनडाच्या नागरिकत्वावर टार्गेट केले जाते यावेळी तुला काय वाटते ? यावेळी अक्षय म्हणाला, ''माझे 14 सिनेमा फ्लॉप झाले होते. त्यावेळी मला वाटले माझे करिअर संपलं. माझा एक जवळचा मित्र त्यावेळी कॅनडामध्ये होता. तो मला म्हणाला तू आणि मी मिळून काम करुया.त्यावेळी मी माझी पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सुरु केली. कारण मला वाटले माझं करिअर इथलं संपलं आहे, मला आता इथं काही सिनेमा मिळणार नाहीत माझा 15वा सिनेमा चालला आणि तोवर माझा पासपोर्ट सुद्धा आला होता. त्यानंतर माझ्या डोक्यातही नाही आले की तो पासपोर्टवर बदलून घ्यावा.आता मात्र मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.''

Web Title: Finally revealed that Akki had accepted Canadian citizenship gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.