FINALLY ‘नवाब’ सैफ अली खान घेणार ‘इन्स्टाग्राम’वर एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 17:15 IST2017-02-24T11:45:11+5:302017-02-24T17:15:11+5:30

बॉलिवूड अभिनेता आणि पतौडी घराण्याचा नवाब सैफ अली खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सैफ अली खान ...

FINALLY 'Nawab' will take Saif Ali Khan an entry on 'Instagram'! | FINALLY ‘नवाब’ सैफ अली खान घेणार ‘इन्स्टाग्राम’वर एन्ट्री!

FINALLY ‘नवाब’ सैफ अली खान घेणार ‘इन्स्टाग्राम’वर एन्ट्री!

लिवूड अभिनेता आणि पतौडी घराण्याचा नवाब सैफ अली खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सैफ अली खान लवकरच इन्स्टाग्रामवर एन्ट्री घेणार आहे. सैफचा मुलगा (पहिली पत्नी अमृता सिंह हिच्यापासून झालेला) इब्राहिम अली खान पतौडी याने एका स्क्रीनशॉटसह ही बातमी शेअर केली आहे.‘सैफ अली खान आॅफिशिअल आॅन इन्स्टाग्राम. येत्या १ मार्चला माझे इन्स्टाग्राम हँडल पब्लिक होईल,’अशा कॅप्शनसह हा स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे.



@saifakpataudi हे सैफच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे युजरनेम असणार आहे. साहजिकच सैफच्या चाहत्यांसाठी ही एक
आनंदाची बातमी असणार आहे. कारण यामुळे चाहत्यांना सैफचे लेटेस्ट फोटो पाहायला मिळतील. या इन्स्टाग्रामवर अकाऊंटनंतर सैफचे फोटो इंटरनेटवर सर्च करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. कारण सैफ स्वत: आपले फोटो अधिकृतपणे या अकाऊंटवर पोस्ट करेल. 

अलीकडे सैफ अली खान हा करण जोहरच्या ‘कॉफी विद करण5’मध्ये पोहोचला होता. यावेळी सोशल मीडियावर नसल्यावरून त्याच्यात आणि करणमध्ये चांगलाच वादविवाद रंगला होता. मी आज सोशल मीडियावर नाही. कदाचित उद्या येईलही. पण मला कधीच मनापासून सोशल मीडियावर यावेसे वाटत नाही. हे माध्यम माझ्यासाठी नाही, असेच मला सुरुवातीपासून वाटत आले आहे. सगळे याठिकाणी आहेत, म्हणून मी सुद्धा असावे, हे माझ्यामते चुकीचे आहे. ज्यादिवशी मला मनापासून वाटेल, त्यादिवशी मी सोशल मीडियावर असेल, असे सैफ म्हणाला होता. कदाचित तो दिवस १ मार्चला उगवणार आहे. होय ना?
 

 

Web Title: FINALLY 'Nawab' will take Saif Ali Khan an entry on 'Instagram'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.