Finally ​‘करण-अर्जुन आयेंगे और आयेंगेही...!!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 16:32 IST2016-12-05T16:32:40+5:302016-12-05T16:32:40+5:30

होय, फायनली शाहरूख खान आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अखेर पडद्यावरचे हे ‘करण-अर्जून’ परत येत आहेत. ...

Finally 'Karan-Arjun will come and I will not ... !!' | Finally ​‘करण-अर्जुन आयेंगे और आयेंगेही...!!’

Finally ​‘करण-अर्जुन आयेंगे और आयेंगेही...!!’

य, फायनली शाहरूख खान आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अखेर पडद्यावरचे हे ‘करण-अर्जून’ परत येत आहेत. भाई जान सलमान आणि किंगखान शाहरूख यांची ‘दुश्मनी’ आपण पाहिलीच. आता या दोघांच्या ‘दोस्ती’चे वारे वाहायला लागले आहे. भूतकाळातले सगळे मतभेद विसरून या दोघांनी काल स्क्रीन अवार्डचे एकत्र होस्टिंग केले. आता ही जोडी चित्रपटातही एकत्र दिसणार आहे. खुद्द शाहरूख आणि सलमानने ही माहिती दिली आहे.
कालच्याच स्क्रीन अवार्डदरम्यान  केवळ सलमान आणि शाहरूख यांचाच जलवा दिसला. दोन ‘खान’ एकत्र आलेले पाहून मीडियाने या दोघांनाही घेतले. मग काय, तुम्ही दोघे कधी एकत्र दिसणार? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर शाहरूख व सलमान दोघांनीही चाहत्यांना अपेक्षित असेच उत्तर दिले. चांगली दमदार स्क्रीप्ट मिळाली तर आम्ही दोघे निश्चितपणे एकत्र काम करू, असे दोघेही म्हणाले.
किमान यावरून तरी हे ‘करण-अर्जून’ दोघेही लवकरच एकत्र दिसतील, असे म्हणता येईल. गेल्या कित्येक वर्षांपासून या जोडीला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर आहे. येणाºया काळात चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. आता हा योग प्रत्यक्ष कधी येतो, हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. पण हा योग लवकरात लवकर यावा, अशीच तमाम चाहत्यांप्रमाणे आमचीही इच्छा आहे. 
शाहरुख -सलमानने 'करण-अर्जुन' सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. या सिनेमामध्ये अभिनेत्री राखी यांनी त्यांच्या आईची भूमिका निभावली होती. ‘मेरे करण-अर्जुन आयेंगे’ हा राखी यांचा डायलॉग या चित्रपटानंतर बराच लोकप्रीय झाला होता. यातच सलमान आणि शाहरुख यांच्या एकत्र येण्याचा उल्लेख येताच आत्ताही हाच डायलॉग आपसूक सर्वांच्या ओठांवर येतो.
 


Web Title: Finally 'Karan-Arjun will come and I will not ... !!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.