​अखेर ‘इंदू सरकार’ सेन्सॉर बोर्डाच्या परिक्षेत पास; काही कट्ससह प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 14:47 IST2017-07-25T09:17:20+5:302017-07-25T14:47:20+5:30

‘रिअ‍ॅलिस्टिक’ चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा मधुर भांडारकर याचा ‘इंदू सरकार’ हा आगामी सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादात ...

Finally, the 'Indu Government' passed the Censor Board examination; Open the way for the exhibition with some cutouts! | ​अखेर ‘इंदू सरकार’ सेन्सॉर बोर्डाच्या परिक्षेत पास; काही कट्ससह प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

​अखेर ‘इंदू सरकार’ सेन्सॉर बोर्डाच्या परिक्षेत पास; काही कट्ससह प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

िअ‍ॅलिस्टिक’ चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा मधुर भांडारकर याचा ‘इंदू सरकार’ हा आगामी सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला होता. काँग्रेसने या चित्रपटाला जोरदार विरोध केला होता. या सिनेमात इंदिरा गांधी, राजीव गांधी व काँग्रेसची बदनामी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला होता. केवळ इतकेच नाही तर या सिनेमासाठी भाजपाकडून पैसे देण्यात आल्याचाही काँग्रेसचा दावा होता. 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांना दाखवण्याची मागणी सेन्सॉर बोर्डाकडे केली होती. यासंदर्भात निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्रदेखील लिहिले होते. पण मधुर भांडारकर यांनी प्रदर्शनापूर्वी सिनेमा कोणालाही दाखवण्यास मनाई केली होती.  याशिवाय संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाºया प्रिया सिंह पॉल हिने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी व संजय गांधी यांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा तिचा दावा होता. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच वादात सापडला होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. होय, सेन्सॉर बोर्डाने चार कट्ससह हा चित्रपट पास केला आहे. मधुर भांडारकर यांनी ही माहिती दिली. ‘सेन्सॉर बोर्डाच्या रिवाइजिंग कमिटीचे आभार. ‘इंदू सरकार’ काही कट्ससोबत पास झाला आहे. २८ जुलैला चित्रपटगृहांत जावून बघा,’ असे टिष्ट्वट मधुरने केले आहे.
आता हा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर तुम्ही तो बघायला किती उत्सूक आहात, हे सांगायला विसरू नका.

Web Title: Finally, the 'Indu Government' passed the Censor Board examination; Open the way for the exhibition with some cutouts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.