अखेर आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिसमधले दुरावा संपला..हा घ्या पुरावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 17:23 IST2017-10-23T09:59:25+5:302017-10-23T17:23:49+5:30

आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामधल्या कॅट फाईटची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. मात्र सध्या दोघींचा एक फोटो ...

Finally, the distinction between Alia Bhatt and Jacqueline Fernandes ended. There is evidence! | अखेर आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिसमधले दुरावा संपला..हा घ्या पुरावा !

अखेर आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिसमधले दुरावा संपला..हा घ्या पुरावा !

िया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामधल्या कॅट फाईटची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. मात्र सध्या दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन दोघींमधील कॅट फाईट संपल्याचे दिसते आहे. सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला अनेकांनी सिद्धार्थची जॅकलिन फर्नांडिसची वाढलेली जवळीकता कारणीभूत ठरवली. ए जेंटलमॅन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकलिन आणि सिद्धार्थ हे एकमेकांच्या जवळ आले असल्याचे बोलले जात होते. चित्रपटातील गाण्यांमध्ये दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. यानंतर आलियाने सिद्धार्थला जॅकलिनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असल्याचेदेखील बोलले जात होते. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढली होती. सिद्धार्थ व जॅकच्या हॉट केमिस्ट्रीने केवळ पडद्यावरच आग लावली नाही तर रिअल लाईफमधील या दोघांची केमिस्ट्री लोकांच्याही ठसठसून डोळ्यांत भरली. दोघांनी चित्रपटात अनेक हॉट सीन्स दिले होते. ‘अ जेंटलमॅन’चे शूटींग सुरु असताना सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. शूटींग संपल्यानंतर दोघांचेही एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह असे सगळे एन्जॉय करणे सुरु असतानाच ही बातमी आलियाच्या कानावर गेली होती.   त्यानंतर दोघींमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या येत होत्या.


मात्र अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत दोघी एकमेंकींना मीठ मारताना दिसल्या. त्यामुळे दोघींमध्ये सगळे अलबेल असल्याचे दिसते आहे. ऐवढेच नाही तर आलिया जॅकलिनच्या गालावर किस करताना सुद्धा दिसते आहे. जॅकलिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वत : हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत जॅकलिनने अनेकांच्या तोडाला टाळं लावले आहे. 

ALSO READ :  वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन- आलिया भट !
 
जॅकलिन लवकरच सलमान खानसोबत रेस 3 चित्रपट स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर आलियाने काही दिवसांपूर्वी मेघना गुलजारच्या राजी चित्रपटाचे शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण केले आहे. यात ती एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारते आहे. यानंतर ती ब्रह्मस्त्र चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. यात अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 

Web Title: Finally, the distinction between Alia Bhatt and Jacqueline Fernandes ended. There is evidence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.