चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी रणवीर सिंग घेणार १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 11:13 IST2017-09-26T05:39:14+5:302017-09-26T11:13:11+5:30

भारत १९८३ मध्ये क्रिकेट विश्वविजेता संघ ठरला या ऐतिहासिक घटनेवर आधारित येणाऱ्या चित्रपटात रणवीर सिंग कोच कपिल देव यांची ...

Before the film was shot, Ranveer Singh would be honored with the 1983 Cricket World Cup | चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी रणवीर सिंग घेणार १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाची भेट

चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यापूर्वी रणवीर सिंग घेणार १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाची भेट

रत १९८३ मध्ये क्रिकेट विश्वविजेता संघ ठरला या ऐतिहासिक घटनेवर आधारित येणाऱ्या चित्रपटात रणवीर सिंग कोच कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे.  त्यासाठी रणवीर सिंग लवकरच विश्ववविजेत्या संघाची भेट घेणार आहे. कपिल देवा यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये वेस्ट इंडिज संघाला मात देऊन भारतीय संघाने विश्वविजेत्या चा 'किताब पटकावला होता. या चित्रपटाची निर्मिती फाँटोम फिल्म्स करणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. चित्रपटाच्या पटकथेचे काम पूर्ण झाले असून या चित्रपटाची टीम पुढील कामाच्या तयारीला लागली आहे. 

फाँटोम फिल्म्सचे संस्थापक मधू मानतेचे म्हणणे आहे की, १९८३  विजेते भारतीय संघाच्या विजयाच्या गोष्टीपासून कामाला सुरुवात करताना आनंद होतो आहे  आणि या चिपटाच्या कामाची सुरुवात विश्वविजेत्या भारतीय संघाबरोबर करतोय हा अनुभव फार छान आहे, सर्व खेळाडूंनी आम्हाला दिलेल्या वेळसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. 
रणवीर सिंग आणि टीमच्या भेटीचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. त्याचबरोबर रणवीर सिंगबरोबर टीमच्या इतर खेळाडूची भूमिकेत कोण इतर कलाकार असतील हे ही अजून गुलदस्त्यातच आहे. 

या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी कबीर खानने रणवीर सिंगची निवड केली. त्याबद्दल त्याला विचारले असता कबीर म्हणतो की, मी जेव्हा या चित्रपटाची पटकथेला जेव्हा अंतिम रूप देत होतो तेव्हाच माझ्या मनात रणवीर सिंगचे नाव आले आणि मला आनंद आहे की रणवीर सिंग यात मुख्य भमिकेत म्हणजेच कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

ALSO READ : ​ अर्जुन कपूर, हृतिक रोशन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार कपिल देव यांची भूमिका

रणवीर सिंगचा पद्मावती चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासह दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरची देखील महत्त्वाची भूमिका आहे. यात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकरते आहे. शाहिद पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसले. 

Web Title: Before the film was shot, Ranveer Singh would be honored with the 1983 Cricket World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.