अक्षय कुमारच्या म्युझिक व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ; 'फिलहाल 2' चे गाणे झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 04:18 PM2021-07-06T16:18:38+5:302021-07-06T16:29:22+5:30

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'फिलहाल 2 मोहब्बत' आज रिलीज झाले असून यात अक्षय आणि नुपूरची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

Filhaal 2 song: Akshay Kumar, Nupur Sanon, Ammy Virk love triangle ends in heartbreak | अक्षय कुमारच्या म्युझिक व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ; 'फिलहाल 2' चे गाणे झाले रिलीज

अक्षय कुमारच्या म्युझिक व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ; 'फिलहाल 2' चे गाणे झाले रिलीज

googlenewsNext

'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार. सिनेमांसोबतच तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळेही जास्त  चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. सध्या फिलहाल २ म्युझिक व्हिडीओमुळे तो चर्चेत आहे. नुकते हे गाणे  रिलीज करण्यात आले आहे. अवघ्या काही तासांतच गाण्याने रसिकांची पसंती मिळवायला सुरुवात केली आहे. इंटरनेटवर अक्षरश: हे गाणे धुमाकूळ घालत आहे.

अक्षय कुमारच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरता असते. त्यामुळे फिलहाल २ म्युझिक व्हिडीओची चाहत्यांना भरपूर उत्सुकता होती. अक्षय कुमारचा 'फिलहाल 2 मोहब्बत' आज रिलीज झाले असून यात अक्षय आणि नुपूरची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांच्या जोडीमुळे या गाण्याला अजूनच चारचाँद लागले आहेत. या हृदयस्पर्शी गाण्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. नुपूर ही क्रिती सॅननची बहिण आहे. सोशल मीडियावर नूपुरचे अनेक फॉलोवर्स आहेत. ती तिच्या स्टाईल, फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे. क्रितीसोबत नूपुरही हेअर ऑईलच्या जाहीरातीत झळकली होती.


फिलहाल गाण्याच्या पहिल्या भागालाही प्रचंड पसंती मिळाली होती.  2019 मध्ये फिलहाल हे गाणे रिलीज झाले होते आणि त्याने अनेक विक्रम नोंदवले होते, जे  यूट्यूबवर  सर्वाधिक व्ह्युज मिळवणा-या भारतातील गण्यांपैकी एक  गाणे ठरले होते.

 

तसेच काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी पोस्टर रिलीज केले आणि त्याचा सिक्वेल जाहीर केला  होता आणि तेव्हापासून फिलहाल २ गाण्याची प्रचंड चर्चा रंगत होती. नवीन गाण्याची झलक दाखवणारे टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग 1 नंबरवर होते.  


फिलहाल 2 मोहब्बत हे गाणे रिलीजच्या काही तासांतच प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या भागाप्रमाणे फिलहाल २  गाणेही रसिकांची पसंती मिळवताना दिसत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Filhaal 2 song: Akshay Kumar, Nupur Sanon, Ammy Virk love triangle ends in heartbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.