​२०१७ सालातील महिला केंद्रित चित्रपट : पाच अभिनेत्रींच्या करिअरसाठी महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 19:47 IST2017-01-12T19:47:35+5:302017-01-12T19:47:35+5:30

मागील वर्ष हे बायोपिकचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. २०१६ साली तब्बल १३ बायोपिक प्रदर्शित झाले. यावर्षी कोणते चित्रपट येणार ...

Female centric films from 2017: Important for five actresses career | ​२०१७ सालातील महिला केंद्रित चित्रपट : पाच अभिनेत्रींच्या करिअरसाठी महत्त्वाचे

​२०१७ सालातील महिला केंद्रित चित्रपट : पाच अभिनेत्रींच्या करिअरसाठी महत्त्वाचे

गील वर्ष हे बायोपिकचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. २०१६ साली तब्बल १३ बायोपिक प्रदर्शित झाले. यावर्षी कोणते चित्रपट येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलीच आहे. यावर्षी प्रदर्शित होणाºया चित्रपटात महिलांवर आधारित विषयांना हाताळले जाणार आहे, यात कंगना रानौत, विद्या बालन, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा व तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या व महिलाकेंद्रित चित्रपटांचे प्रदर्शन फेब्रुवारी ते जुलै महिन्यादरम्यान केले जाणार आहे. हे सर्व चित्रपट त्यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरणार आहेत. तर कंगणा रानौतचा चित्रपट सव्वा वर्षांनंतर पडद्यावर झळकणार आहे. 

कंगनाचा मागील चित्रपट  ‘कट्टी-बट्टी’ हा २०१५ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता, यानंतर ती रंगूनच्या चित्रीकरणात व्यस्त झाली होती. २०१६ साली हृतिक रोशन सोबतच्या वादामुळे ती चर्चेत राहिली. कंगनाचे यावर्षी दोन चित्रपट प्रदर्शित होणारा आहेत. ‘क्वीन’ व ‘तनू वेड्स मनू’च्या यशामुळे शिखरावर पोहचलेली कंगना आपले स्टारडम कायम ठेवणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 









विद्या बालन हिनचे मागील पाच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘कहानी २’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप नसला तरी तो हिट म्हणता येणार नाही. यामुळे तिचा आगामी ‘बेगम जान’ हा चित्रपट तिच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सोनाक्षी सिन्हा हिची अवस्था विद्यासारखीच आहे. तिचेही पाच चित्रपट अयशस्वी ठरले आहेत. तिचा आगामी ‘नूर’ हा चित्रपट एप्र्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. ‘नूर’ हिट झाला तर हे यश तिच्यासाठी मोठे ठरेल. ‘आशिकी २’ नंतर श्रद्धा कपूर हिचे बहुतेक सर्व चित्रपट ठरले आहे. ‘रॉक आॅन २’ ने तिच्या यशस्वी चित्रपटाची मालिका खंडीत झाली. यावर्षी श्रद्धाचे काही चांगले चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तापसी पन्नू ही देखील ‘पिंक’नंतर महिला केंद्रित चित्रपटांचा चेहरा झाली आहे. तिचा आगामी ‘नाम शबाना’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पैकी एकाही अभिनेत्रीचा चित्रपट फ्लॉप ठरला तर तिच्या करिअरसाठी तो घातक ठरू शकतो. 

कंगना रानौत बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फी घेणारी अभिनेंत्री असून ती एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये घेते. मात्र विशाल भारद्वाजच्या चित्रपटासाठी कंगनाने ६ कोटी रुपये घेतले होते. 

Web Title: Female centric films from 2017: Important for five actresses career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.