फवादचा महिराला टोला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 08:32 IST2016-03-29T15:32:50+5:302016-03-29T08:32:50+5:30

पाकिस्तानी टीव्ही हिट जोडी फवाद खान आणि महिरा खान पाकिस्तानातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. पाकिस्तानी टीव्ही शो ‘हमसफर’ साठी ...

Faulty woman! | फवादचा महिराला टोला !

फवादचा महिराला टोला !

किस्तानी टीव्ही हिट जोडी फवाद खान आणि महिरा खान पाकिस्तानातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. पाकिस्तानी टीव्ही शो ‘हमसफर’ साठी काम करून त्यांनी हजारो, लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांच्याकडून कौतुकही करून घेतले.

दोघांनी आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. फवादने ‘खुबसुरत’ आणि ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’च्या निमित्ताने आपला जम बसवला आहे. तर महिरा ‘रईस’ च्या माध्यमातून किंग खानसोबत काम करत आहे. तिचा या चित्रपटाच्या द्वारे होणारा डेब्यू खुप उत्सुकतेची बाब ठरणार आहे. तिचे चाहते आता तिला बिग स्क्रीन पाहिल्याशिवाय राहणार नाहीत.

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान फवादला विचारण्यात आले की, महिरा मुंबईत रईससाठी शूटिंग करत असूनही तुझी आणि तिची भेट झाली की नाही? तेव्हा तो म्हणाला,‘ आम्ही मागील वर्षी मुंबईत भेटलो. पण, सध्या दोघांचेही शेड्यूल खुपच बिझी सुरू आहे. ती एका खुप मोठया स्टारसोबत चित्रपटाचे शूटिंग करत आहे. वैसे भी, बडी स्टार्स के पास, हम जैसे छोटे लोगों के लिए टाईम नही होगा.’ 

Web Title: Faulty woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.