‘कबाली’चा फिव्हर असाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 13:34 IST2016-07-15T08:04:58+5:302016-07-15T13:34:58+5:30
‘कबाली’ चित्रपटाचा फिव्हर दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. हल्ली सगळ्यांच्याच हातातील स्मार्टफोनच्या कव्हरवर ‘थलाइवा’ ...

‘कबाली’चा फिव्हर असाही...
‘ बाली’ चित्रपटाचा फिव्हर दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. हल्ली सगळ्यांच्याच हातातील स्मार्टफोनच्या कव्हरवर ‘थलाइवा’ रजनीकांत झळकत आहे. ‘कव्हर इट अप’ या स्टार्टअप कंपनीने ‘कबाली’च्या निर्मात्यांशी हातमिळवणी करत हे ‘कबाली कव्हर्स’साकारले आहेत. ‘कव्हर इट अप’चे संस्थापक रौनक सरदा यांनी ‘कबाली’च्या रुपाने मिळालेल्या प्रसिद्धीबाबत सांगताना, ‘या यशाकडे मी इतर कोणत्याही दृष्टीने न पाहता एक महत्त्वाची संधी म्हणून पाहतो, तसेच ही संकल्पना नफा मिळवण्यापेक्षा इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरणार आहे’, अशी प्रतिक्रीया वृत्तसंस्थांशी बोलताना दिली. ‘एक स्टार्टअप कंपनी असूनही, ‘कबाली’च्या संपूर्ण टीमने आम्हाला प्रचंड सहकार्य केले जे खरेच थक्क करणारे होते, आमच्या डिझाइन्सना ‘कबाली’च्या टीमचा एक भाग समजून वेळोवेळी सगळ्यांनी केलेली आमची प्रशंसा आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे‘, असेही रौनक म्हणाला.