फरहान अख्तरच्या 'तुफान' चित्रपटातील 'तोडून टाक!' गाणे झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:10 PM2021-07-05T22:10:46+5:302021-07-05T22:11:17+5:30

फरहान अख्तरचा 'तुफान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Farhan Akhtar's 'Toofan' movie 'Todun Tak!' The song was released | फरहान अख्तरच्या 'तुफान' चित्रपटातील 'तोडून टाक!' गाणे झाले रिलीज

फरहान अख्तरच्या 'तुफान' चित्रपटातील 'तोडून टाक!' गाणे झाले रिलीज

googlenewsNext

फरहान अख्तर अभिनीत धडाकेबाज ट्रेलरने प्रेक्षकांना आकर्षित केल्यानंतर आज अमेझॉन प्राईम व्हिडीओने आणखी एक परिणामकारक सिनेगीत तोडून टाक प्रसिद्ध केले. बुलंद आवाजातील हा म्युझिक व्हीडीओ प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. एखाद्याच्या अंतर्गत शक्ती, इच्छाशक्ती आणि विपरीत परिस्थितीतून जिद्दीचा संघर्ष या कलाकृतीतून मांडण्यात आला आहे. 

“इंडिया के तुफान”- देशातील श्रेष्ठ बॉक्सर या व्हिडीओतून आपल्याला दिसतील. चार मिनिटांच्या या व्हिडीओतून भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील अस्सल हिरो– जगश्रेष्ठ सुवर्ण, रौप्य आणि ताम्र पदकप्राप्त लेशराम सरिता देवी, सोनिया चहल, कविता चहल, दोनदा जागतिक युवा विजेतेपद पटकावणारी नीतू घंघास आणि भारतीय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग विजेती थुलासी हेलेन सोबत तीनदा डब्ल्यूबीसी आशिया बिरूद मिळवणारा नीरज गोयत तसेच राज्य विजेता, रजत पदक प्राप्त – अमन झांगडा, ऑल इंडिया फेडरेशन कप विजेता – गगन “द पिटबुल” शर्मा, राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता, सुवर्ण आणि ताम्र पदकप्राप्त – अरबिंद कुमार प्रसाद आणि बिनोद कुमार प्रसाद तसेच पूर्व क्षेत्र राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता सुवर्ण आणि रजत पदकप्राप्त स्वयम मलिक आणि बिनीत गुरंग यांचा समावेश आहे.  हा व्हीडीओ बॉक्सिंग समुदाय आणि विविध अकादमी भिवानी बॉक्सिंग क्लब (हरियाणा), सरिता रिजनल बॉक्सिंग अकॅडमी (मणिपूर), बालाजी बॉक्सिंग क्लब (कोलकाता), भोवानीपूर बॉक्सिंग असोसिएशन (कोलकाता), नजाफगरह बॉक्सिंग अकॅडमी (दिल्ली) आणि र्युको ट्रेनिंग सेंटर (लास वेगास) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता.  
सुप्रसिद्ध रॅपर डी’इव्हील उर्फ धवल परब आणि संगीत निर्माता दुब शर्मा यांनी तोडून टाक’ला जिवंत केले. तोडून टाक हे लढवय्यांना केलेले वंदन आहे आणि शोषण व त्यातून होणाऱ्या पराजयाविरोधात 'लढण्याचे’ आवाहन आहे. हा एक्शनपूर्ण आणि धुमशान घालणारा व्हिडीओ अनुष्का मनचंदा व सचिन एस. पिल्लई यांनी एडीट केला असून त्यांनीच चित्रीकरण केले होते. वॉकअबाऊट फिल्म्स या सिनेमाचा निर्माता असून अनन्या दासगुप्ता कार्यकारी निर्माती आहे. या व्हीडीओची पटकथा नवझार इराणी यांची असून त्यांचेच दिग्दर्शन लाभले आहे. याची सुरूवात फरहान अख्तर याच्या तुफानी आवाजाने झाली आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओने एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या साथीने तुफान’चे सादरीकरण केले असून रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर या प्रेरणादायक कथानकाचे निर्माते आहेत.

या सिनेमात प्रमुख भूमिकेत फरहान अख्तर असून इतर कलाकारांत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ यांचा समावेश आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या सिनेमाचा जोरदार ट्रेलर स्थानिक गुंड अज्जू भाईशी भेट घडवतो. हाच अज्जू भाई पुढे अझीझ अली नावाने व्यावसायिक बॉक्सर होतो. ‘तुफान’ ही आशा, विश्वास आणि आंतरिक शक्तीला आणि जिद्द आणि महत्त्वाकांक्षेची जोड असलेली कथा आहे. हा चित्रपट १६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
 

Web Title: Farhan Akhtar's 'Toofan' movie 'Todun Tak!' The song was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.