​श्रद्धा कपूरवरून फरहान अख्तर अन् आदित्य राय कपूर यांच्यात जुंपली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 11:27 IST2017-04-05T05:57:55+5:302017-04-05T11:27:55+5:30

श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या आगामी सिनेमामुळे नाही तर फरहान अख्तर आणि आदित्य राय कपूर यांच्यातील ...

Farhan Akhtar and Aditya Rai Kapoor jumped from Shraddha Kapoor? | ​श्रद्धा कपूरवरून फरहान अख्तर अन् आदित्य राय कपूर यांच्यात जुंपली?

​श्रद्धा कपूरवरून फरहान अख्तर अन् आदित्य राय कपूर यांच्यात जुंपली?

रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या आगामी सिनेमामुळे नाही तर फरहान अख्तर आणि आदित्य राय कपूर यांच्यातील भांडणामुळे. होय, श्रद्धावरून फरहान आणि आदित्य यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याचे कळतेय. बिचारी श्रद्धा, अशावेळी काय करणार? ती दोघांनाही आपआपल्यापरिने सांभाळण्याचे प्रयत्न करतेय.
‘आशिकी2’ नंतर श्रद्धा कपूर व आदित्य राय कपूर यांच्या प्रेमाची चर्चा सुरु झाली होती. अर्थात दोघांनीही हे प्रेम कधीही स्वीकारले नाही. पण त्याकाळात हे दोघे अनेकदा एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसले. ‘आशिकी2’नंतर श्रद्धा ‘रॉक आॅन2’मध्ये दिसली. विशेष म्हणजे, यादरम्यान श्रद्धाचे नाव आदित्यसोडून फरहानसोबत जोडले गेले. मीडियात या दोघांच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा झाली. पण याहीवेळी श्रद्धाने यावर बोलणे टाळले. फरहान व श्रद्धामध्ये सगळे काही आॅलवेल असल्याचे मानले जात असताना अलीकडे ‘ओके जानू’च्या सेटवर श्रद्धा व आदित्य पुन्हा एकदा एकत्र आले. दोघांमधील ही केमिस्ट्री पडद्यावरही दिसली.



ALSO READ :
 ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे नवे पोस्टर आले; ‘या’ तारखेला येणार ट्रेलर!!

इथेच नेमका घोळ झाला. फरहानला हे अजिबात आवडले नाही. मीडियाचे मानाल तर, यावरूनच फरहान व आदित्य या दोघांत जोरदार फाईट झाली. या भांडणाचे कारण अर्थात श्रद्धा होती. श्रद्धासोबत आदित्यची वाढती जवळीक फरहानला पसंत नाही. सूत्रांचे मानाल तर, आदित्य व श्रद्धाच्या या वाढत्या जवळीकीमुळे फरहान कमालीचा दुखावला आहे. त्याचा हाच राग आदित्यवर निघाला आणि दोघांमध्ये भांडण झाले. श्रद्धाने कसेबसे दोघांनाही आवरले. वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून फरहानला समजवण्यासाठी ती त्याच्या घरापर्यंत गेली. फरहानच्या घराबाहेर आदित्यची गाडीही उभी दिसली. याचा अर्थ खुद्द आदित्य श्रद्धाला भांडणाचा सोक्षमोक्ष लावायला फरहानच्या घरी घेऊन आला होता.

Web Title: Farhan Akhtar and Aditya Rai Kapoor jumped from Shraddha Kapoor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.