प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, दिग्गज अभिनेत्रीचा जावई, सध्या कुठे आहे फरदीन खान ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 07:24 PM2023-03-08T19:24:02+5:302023-03-08T20:08:01+5:30

पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेल्या फरदीनकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या.

Fardeen khan son of feroz khan who married to mumtaz daughter out of industry because drugs case | प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, दिग्गज अभिनेत्रीचा जावई, सध्या कुठे आहे फरदीन खान ?

प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, दिग्गज अभिनेत्रीचा जावई, सध्या कुठे आहे फरदीन खान ?

googlenewsNext

बॉलिवूडमधील काही वडील-मुलाच्या जोडी हिट तर काही फ्लॉप ठरल्या. प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते फिरोज खान (Feroz Khan) यांचा मुलगा फरदीन खान(Fardeen Khan) हा फ्लॉप स्टारकिड्सपैकी एक आहे. फरदीनने 1998 मध्ये 'प्रेम अगन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेल्या फरदीनकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. कौटुंबिक वारसा पुढे नेणारा दुसरा यशस्वी अभिनेता मिळेल अशी अपेक्षा होती पण फरदीनचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले.

8 मार्च 1974 रोजी जन्मलेल्या अभिनेता फरदीन खानने शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. फिरोज यांनी आपल्या मुलाचा पहिला चित्रपट 'प्रेम अगन' निर्मिती केली. या चित्रपटानंतर फरदीनच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही.  ज्या चित्रपटाने फरदीन खानला चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली तो म्हणजे राम गोपाल वर्माचा चित्रपट 'जंगल'. 2000 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'जंगल' चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. त्या काळात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

इंडस्ट्रीतून झाला गायब 
यानंतर फरदीनने 'लव लिए कुछ भी करेगा', 'प्यार तूने क्या किया', 'हम हो गये आपके', 'कितने दूर कितने पास', 'ओम जय जगदीश' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण हे सर्व चित्रपट यशस्वी होऊ शकले नाहीत. फरदीनला पुन्हा एकदा राम गोपाल वर्मासोबत 2003 मध्ये आलेल्या 'भूत' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.'भूत'  सुपरहिट ठरला. आणि 2005 मध्ये आलेला 'नो एंट्री' हा चित्रपट फरदीन खानच्या करिअरमधील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरला. पण 2010 नंतर फरदीन इंडस्ट्रीतून गायब झाला.


2001 हे वर्ष फरदीनसाठी खूप कठीण होते. कोकेनचे सेवन आणि अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याला फरदीन रिहॅब सेंटरमध्ये दाखल केले होते. यादरम्यान फरदीनचे वजनही खूप वाढले होते. पण गेल्या वर्षी फरदीनचा एक फोटो समोर आला होता ज्यात त्याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांना चकित केले होते.

फरदीन खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याने  ज्येष्ठ अभिनेत्री मुमताजची मुलगी नताशा माधवानीशी लग्न केले आहे. फरदीन आणि नताशा यांना दोन मुले आहेत. फरदीन हा व्यवसाय करतो आणि त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. 
 

Web Title: Fardeen khan son of feroz khan who married to mumtaz daughter out of industry because drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.