Video : ट्रेलर लॉन्चवेळी अनियंत्रित झाले पवन कल्याणचे फॅन्स, खिडक्या तोडून थिएटरमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 11:32 AM2021-03-30T11:32:43+5:302021-03-30T11:33:15+5:30

ट्रेलर लॉन्चची वेळ जवळ येताच गर्दी अनियंत्रित झाली. थिएटरमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सगळे उतावीळ झालेत. अगदी हाणामारी सुरु झाली. अनेकांनी थिएटरमधील खिडकीच्या काचा फोडल्या.

fans uncontrolled on the trailer release of pawan kalyan film shattering theater watch video | Video : ट्रेलर लॉन्चवेळी अनियंत्रित झाले पवन कल्याणचे फॅन्स, खिडक्या तोडून थिएटरमध्ये प्रवेश

Video : ट्रेलर लॉन्चवेळी अनियंत्रित झाले पवन कल्याणचे फॅन्स, खिडक्या तोडून थिएटरमध्ये प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वकील साब’ या सिनेमाद्वारे पवन कल्याण सुमारे दोन वषार्नंतर पुनरागमन करतो आहे.

आपल्या आवडत्या कलाकारासाठी क्रेजी चाहते काय करतील, याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, अभिनेता पवन कल्याण याच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्यावेळी चाहत्यांनी असा काही गोंधळ घातला की, चेंगराचेंगरी झाली. यात अनेक लोक जखमी झालेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 विशाखापट्टणममधील संगम शरत थिएटरमध्ये पवनच्या ‘वकील साब’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये काल चेंगराचेंगरीची ही घटना घडली.

4 वाजता ट्रेलर लॉन्च होणार होता. पण पवन कल्याणच्या चाहत्यांनी दुपारी 2 वाजतापासूनच गर्दी केली.  चाहत्यांची इतकी गर्दी केली की थिएटर बाहेरचा रस्ता जाम झाला. अशास्थितीत चाहत्यांनी पवन कल्याणचा फोटो ठेवून पूजाअर्चा सुरू केली. यानंतर ‘वकील साब’च्या ट्रेलर लॉन्चची वेळ जवळ येताच गर्दी अनियंत्रित झाली. थिएटरमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सगळे उतावीळ झालेत. अगदी हाणामारी सुरु झाली. अनेकांनी थिएटरमधील खिडकीच्या काचा फोडल्या. काहींना छताच्यावरुन आत जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात काही लोक जमिनीवरही पडले आहेत तर काहींना किरकोळ जखमीही झाली आहे.

‘वकील साब’ या सिनेमाद्वारे पवन कल्याण सुमारे दोन वषार्नंतर पुनरागमन करतो आहे. या कारणास्तव निर्मात्यांनी होळीच्या विशेष निमित्ताने चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. पवनचा ‘वकील साब’ हा चित्रपट ‘पिंक’ या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. ‘पिंक’मध्ये अबिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसले होते.  

Web Title: fans uncontrolled on the trailer release of pawan kalyan film shattering theater watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood