Fans Good News : दिलीपकुमार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 09:20 AM2017-08-08T09:20:08+5:302017-08-08T14:50:34+5:30

गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज दिला ...

Fans Good News: Dilip Kumar gets discharge from hospital today! | Fans Good News : दिलीपकुमार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज !

Fans Good News : दिलीपकुमार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज !

googlenewsNext
ल्या आठवडाभरापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे समजते. दिलीपकुमार यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून, बॉलिवूडमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. 

डिहायड्रेशन आणि किडनीच्या आजारामुळे गेल्या बुधवारी दिलीपकुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारनंतर त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. शनिवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. शनिवारी प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनी डिनरही केले होते. डॉक्टरांसाठी ही बाब शुभसंकेत होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती दरदिवसाला सुधारत गेली. आज त्यांच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा झाल्यानेच त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, दिलीपकुमार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभर त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. अभिनेते धर्मेंद्र आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता ईश्वर चरणी प्रार्थना केली. आता दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयात आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. दरम्यान, गेल्या बुधवारपासून त्यांची पत्नी सायरा बानो रुग्णालयातच असून, त्यांची काळजी घेत आहेत. त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण परिवारही सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: Fans Good News: Dilip Kumar gets discharge from hospital today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.