जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:18 IST2025-09-27T18:18:26+5:302025-09-27T18:18:53+5:30
जॉन अब्राहमच्या (John Abraham) सुपरहिट ॲक्शन फ्रँचायझी 'फोर्स' (Force)च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'फोर्स 3' (Force 3) च्या तयारीला सुरुवात झाल्याचे समजते आहे.

जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
जॉन अब्राहमच्या (John Abraham) सुपरहिट ॲक्शन फ्रँचायझी 'फोर्स' (Force)च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'फोर्स 3' (Force 3) च्या तयारीला सुरुवात झाल्याचे समजते आहे. यावेळी रुपेरी पडद्यावर जॉन अब्राहम ॲक्शनसोबतच एक दमदार कथा घेऊन येत आहे. पण सर्वात खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटात साउथ सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री मीनाक्षी चौधरी (Meenakshi Chaudhary)ची वर्णी लागल्याची चर्चा आहे. थलपती विजयचा 'GOAT', महेश बाबूचा 'गुंटूर करम' आणि नानीचा 'हिट २' यांसारख्या चित्रपटांसोबतच तिने दुलकर सलमानच्या 'लकी भास्कर'मध्येही सर्वांची मनं जिंकली आहेत.
'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, वेंकटेशसोबत 'संक्रांति वस्तुनम'मध्ये दिसलेली मीनाक्षीला 'फोर्स ३'साठी साइन करण्यात आले आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, "अनेक नावांच्या ऑडिशननंतर जॉन अब्राहम आणि भाव धूलियाने 'फोर्स ३'मध्ये मीनाक्षी चौधरीला फायनल केले आहे. जॉन प्रमाणेच चित्रपटात मीनाक्षी चौधरीदेखील ॲक्शन करताना दिसणार आहे. ती पुढील काही महिन्यांत ॲक्शन वर्कशॉपमध्ये भाग घेईल."
कोण आहे मीनाक्षी चौधरी?
मीनाक्षी चौधरीने २०१७ मध्ये हिंदी चित्रपट 'अपस्टार्ट्स' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर २०२१ मध्ये तिने 'Ichata Vahanamulu Niluparadu' या तेलगू चित्रपटाद्वारे साउथमध्ये प्रवेश केला. गेल्या ४ वर्षांत तिने तमीळ आणि तेलगूमध्ये ११ चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे, मीनाक्षी साउथ सिनेमात लोकप्रिय झाली असली तरी ती मूळची पंचकुला, हरियाणाची रहिवासी आहे.
मिस इंडिया इंटरनॅशनल आणि कर्नलची कन्या
मीनाक्षी चौधरी २८ वर्षांची आहे. ५ मार्च १९९७ रोजी गुर्जर हिंदू कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीचे वडील दिवंगत बीआर चौधरी हे भारतीय सेनेत कर्नल होते. मीनाक्षीने २०१८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता आणि 'मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल'चा ताज जिंकला. यानंतर मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८ मध्ये ती फर्स्ट रनरअप निवडली गेली. तिने चंदीगडच्या सेंट सोल्जर इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. ती राज्यस्तरीय स्विमर आणि बॅडमिंटन खेळाडूही राहिली आहे. मॉडेलिंगमधून सिनेजगतात आलेल्या मीनाक्षीने पंजाबमधील नॅशनल डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, डेरा बस्सी येथून डेंटल सर्जरीची पदवीही घेतली आहे.
या वर्षाखेरीस शूटिंगला करणार सुरूवात
चर्चा आहे की, 'फोर्स ३'चे शूटिंग याच वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू होईल. सध्या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम वेगाने सुरू आहे. जॉन अब्राहम सध्या रोहित शेट्टीसोबत राकेश मारियाच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. यानंतर लगेच तो 'फोर्स ३' च्या शूटिंगला सुरुवात करेल.