सलमानसह सुलतानच्या संपूर्ण टीमवर फसवणूकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 15:55 IST2016-07-09T10:25:28+5:302016-07-09T15:55:28+5:30
चित्रपट ‘सुलतान’वर २० करोड रुपयांचा दंडात्मक दावा कोर्टात ठोकण्यात आला आहे. सदर गुन्हा नगर पोलीस स्टेशनमध्ये इस्लामपुर लक्ष्मी नारायण ...
.jpg)
सलमानसह सुलतानच्या संपूर्ण टीमवर फसवणूकीचा गुन्हा
च त्रपट ‘सुलतान’वर २० करोड रुपयांचा दंडात्मक दावा कोर्टात ठोकण्यात आला आहे. सदर गुन्हा नगर पोलीस स्टेशनमध्ये इस्लामपुर लक्ष्मी नारायण रोडलगत राहणारे साबिर अंसारी उर्फ साबिर बाबा यांनी दाखल केला आहे. साबिरने दावा केला आहे की, त्यांच्या जीवनावर हा चित्रपट बनविण्यात आला आहे. रॉयल्टीसाठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा सलमान खानने मुंबईला बोलावून चर्चा केली आणि सांगितले की, आपल्या जीवनाशी मिळता-जुळता चित्रपट सुलतान बनवित आहोत, यासाठी आपल्याला २० करोड रुपयांची रॉयल्टी देणार.
चित्रपट रिलीज होऊन चित्रपटगृहांमध्ये झळकलाही, मात्र मला या चित्रपटाची रॉयल्टी अजूनही मिळाली नाही, असे साबिरने सांगितले. हेच प्रकरण मो. साबिरने सीजेएमच्या कोर्टात दाखल केले. यात अभिनेता सलमान, अभिनेत्री अनुष्का शर्मा, निर्देशक अली अब्बास जफर व निर्माता यांना आरोपी केले आहे.