‘आँखों ही आँखों में...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 18:20 IST2016-12-09T18:20:46+5:302016-12-09T18:20:46+5:30

देवानंद आणि गीता दत्त यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं ‘सीआयडी’ चित्रपटातलं ‘आँखो ही आँखो में ’ हे गाणं तुम्हाला आठवतेय ...

'Eyes are in the eyes ...' | ‘आँखों ही आँखों में...’

‘आँखों ही आँखों में...’

वानंद आणि गीता दत्त यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं ‘सीआयडी’ चित्रपटातलं ‘आँखो ही आँखो में ’ हे गाणं तुम्हाला आठवतेय का? तशीच काहीशी अवस्था आता युवी अन् हेजलची झालेली दिसतेय. नवदाम्पत्य युवराज सिंग आणि हेजल कीच हे दोघे अलीकडेच एकमेकांसोबत लग्नाच्या गोड बंधनात अडकले आहेत. गोवा, चंदीगढ येथे पंजाबी आणि हिंदू पद्धतीने लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर आता ते त्यांच्या हनिमूनला जाण्यासाठी उत्सूक आहेत. जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवून ते त्यांच्या भावी आयुष्याची गोड स्वप्ने पाहत आहेत. 

                       

हेजलने तिच्या सोशल साईटवरील अकाऊंटवर एक फोटो शेअर करून चाहत्यांना जणू काही एक गिफ्टच दिले आहे. या फोटोत ते दोघे एकमेकांकडे पाहण्यात दंग असून, त्यांचे एकमेकांवरचे प्रेम जणूकाही डोळयांच्या साहाय्याने व्यक्त करत असल्यासारखेच वाटतेय. युवराज आणि हेजल हे कपल सध्याच्या सर्वांत हॉट कपलच्या जोड्यांपैकी एक मानले जाते. त्यांच्या लग्नाला भारतीय क्रिकेट टीम, बॉलिवूड, राजकारणी मंडळी उपस्थित होते. दिल्लीत नुकतेच त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही पार पडले.

Web Title: 'Eyes are in the eyes ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.