या अभिनेत्याने सोनम कपूरच्या लग्नाच्या गोष्ट केली कन्फर्म..जाणून घ्या काय केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 12:04 IST2018-01-13T06:34:08+5:302018-01-13T12:04:08+5:30

सोनम कपूरच्या आयुष्यात सध्या आनंदी आनंद आहे. यामागे दोन कारणं आहेत. एक तर तिचा 25 जानेवारीला अक्षय कुमारसोबतचा पॅडमॅन ...

Explain what happened to this actress by knowing the story of the marriage of Sonam Kapoor | या अभिनेत्याने सोनम कपूरच्या लग्नाच्या गोष्ट केली कन्फर्म..जाणून घ्या काय केला खुलासा

या अभिनेत्याने सोनम कपूरच्या लग्नाच्या गोष्ट केली कन्फर्म..जाणून घ्या काय केला खुलासा

नम कपूरच्या आयुष्यात सध्या आनंदी आनंद आहे. यामागे दोन कारणं आहेत. एक तर तिचा 25 जानेवारीला अक्षय कुमारसोबतचा पॅडमॅन हा चित्रपट रिलीज होतो आहे तर दुसरीकडे सोनमच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोनम कपूर एप्रिल महिन्यांत लग्नाच्या बेडीत तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत अडकणार आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारने ही इशारो इशारो मध्ये सोनम लग्न करणार असल्याचे संकेत दिले. अक्षय कुमारच्या बोलण्यावर सोनम कपूर ब्लश करायला लागली. पॅडमॅन नंतर सोनम कपूरचा वीरे दी वेडिंग चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .
पॅडमॅनच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि सोनम कपूर  'इनोवेशन कॉन्क्लेव'मध्ये पोहोचले होते. यावेळी अक्षयने सोमनमला विचारले तू यावर्षी लग्न करणार आहेस का ? ''जर तू या वर्षी लग्न करणार अशील तर मी तुला  ऑटोमेटिक कुकिंग मशीन गिफ्ट म्हणून देईन. ज्यावर तुझा नवरा तुला जेवण बनवायला शिकवेल.'' अक्षयच्या या प्रश्नवर सोनम काही बोलली नाही फक्त ती एक स्माईल दिली.  मात्र सोनमचे एक स्माईल बरेच काही सांगून गेली. यावरून आपण अंदाज लावू शकतो की सोनम यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकायला तयार आहे. काही दिवसांपूर्वी सोनमने आपण पॅडमॅन आणि वीरे दी वेडींगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले होते. मात्र सोनम काहीही म्हणा तिचे एक हास्य बऱ्याच गोष्टींचा उलगडा करून गेले. 

ALSO READ :   ‘फोमच्या गादी’मुळे त्रासली सोनम कपूर! रागात केले असे ट्विट!!


सोनम एप्रिलमध्ये जोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे समजते आहे.  सोनम आणि आनंद जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या कधी स्वीकरले नाही आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे.   त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न  सुमारे २८ अरब इतके आहे.   

Web Title: Explain what happened to this actress by knowing the story of the marriage of Sonam Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.