​या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी चेहºयावर केले प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 17:39 IST2017-02-25T12:09:00+5:302017-02-25T17:39:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया पुन्हा एकचा चर्चेच आली आहे. नुकतीच ती एका कार्यक्रमात उपस्थित होती. यावेळी तिचा लूक पाहून ...

The experiments done by the actress to look beautiful | ​या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी चेहºयावर केले प्रयोग

​या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी चेहºयावर केले प्रयोग

लिवूड अभिनेत्री आयशा टाकिया पुन्हा एकचा चर्चेच आली आहे. नुकतीच ती एका कार्यक्रमात उपस्थित होती. यावेळी तिचा लूक पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. आयशा टाकियाने केलेली प्लास्टिक सर्जरी मुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. आयशाने प्लास्टिक सर्जरी केल्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही यापूर्वी तिने ब्रेस्ट इम्प्लांट, आयब्रो आणि जालाईन सर्जरी केली आहे. मात्र यावेळी केलेली सर्जरी फेल ठरल्यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपण अधिक सुंदर दिसावे यासाठी आपल्या चेहºयावर सर्जरीच्या माध्यमातून विविध प्रयोग केले आहेत. 



अनुष्का शर्मा : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आपले ओठ आवडत नव्हेत की काय असेच म्हणावे लागले. तिने देखील आपल्या ओठांवर सर्जरी क रून त्याला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉफी विद करणच्या मागील सिजनमध्ये उपस्थित झाल्यावर तिचा नवा लूक समोर आला होता व अनेकांनी तिच्यावर कमेंट केले होते. 



शिल्पा शेट्टी : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ओळख बॉलिवूडमध्ये सर्जरी क्वीन म्हणून निर्माण झाली आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तिने किती सर्जरी केल्या असतील. शिल्पाने ब्रेस्ट इम्प्लांट, लिप्स, नाक व कंबरेच्या खालच्या भागाची देखील सर्जरी केली आहे असे सांगण्यात येते. शिल्पाच्या सर्जरी यशस्वी झाल्या असेच म्हणावे लागेल, कारण तिने केलेल्या सर्जरीचा फारसा उल्लेख झाला नाही किंवा ती सोशल मीडियावरून तिच्यावर क मेंटही करण्यात आले नाही. 



प्रीति झिंटा : मागील दहा वर्षांत अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लूकमध्ये झालेले बदल पाहिल्यास तिने आपल्या चेहºयावर केलेल्या सर्जरीचा अंदाज लावता येतो. एकेकाळी गालावरच्या डिंपलसाठी फेमस असलेल्या प्रीतीच्या चेहºयावरील ग्लो कमी होत गेला. चाहते याला वयाचा फरक आहे असे म्हणू शकतात, पण तिच्या चेहºयावर केलेल्या सर्जरीचा देखील यात मोठा वाटा आहे. 



गौहर खान : अभिनेत्री गौहर खानला लिप सर्जरीचा फारसा चांगला अनुभव आला नाही. तिने केलेल्या सर्जरीमुळे माझे ओठ खराब झाले असेच तिने सांगायचे बाकी राहिले होते. आपल्या ओठांवर अयशस्वी ठरलेल्या सर्जरीमुळे तिने ‘खान सिस्टर्स’ या रिआॅलिटी शोची शूटिंग कॅन्सल केली होती. यानंतर तिने पुन्हा नव्याने सर्जरी करून बºयापैकी लूक मिळविला आहे.



राखी सावंत : आयटम नंबरसाठी फेमस असलेल्या राखी सावंतने तर आपल्या शरीराला सर्जरीची प्रयोगशाळा बनविले की काय असेच म्हणावे लागले. ब्रेस्ट सर्जरीपासून ते जॉलाईन ठिक करण्यापर्यंत बºयाच सर्जरी तिने केल्या आहेत. सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयोग राखीने केले असले तरी देखील फारसा काही फरक पडला नाही असेच म्हणावे लागेल. 



कोयना मित्रा : आयटम गर्ल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी कोयना मित्राने आपण यापेक्षाही सुंदर दिसू शकतो याविचाराने नाकाची सर्जरी केली होती. मात्र यामुळे तिचे नाक तर चांगले झाले नाही उलट तिची ही सर्जरी फेल ठरली. आपल्या नाकाला ठिक करण्यासाठी तिला पुन्हा एकदा सर्जरी करावी लागली होती. 



मीनीषा लांबा : अभिनेत्री मीनीषा लांबा हिने आपल्या नाकावर सर्जरी केली, मात्र तिच्या चाहत्यांना यामुळे दु:ख झाले असेच म्हणावे लागेल. तिच्या अनेक चाहत्यांच्या मते ती सर्जरीपूर्वीच खूप सुंदर दिसत होती. मीनीषा लांबाने बॉलिवूडमध्ये मोजकेच चित्रपट केले असले तरी देखील तिच्या फॅन्सची सख्या मोठी होती, तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा होते. 



कंगना राणौत : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला आपल्या पहिल्या चित्रपट गँगस्टरच्या शूटिंग दरम्यान आपल्या ओठांवर सर्जरी करावी लागण्याचा प्रसंग ओठावला होता. ‘गँगस्टर’मध्ये अभिनेता शायनी अहूजा कंगनाच्या कानशिलात लगावतो असा सिन आहे. या सिनमध्ये शायनीने खरोखरच क ंगनाला गालावर जोरदार मारले होते. यामुळे तिचे ओठ फाटले गेल. गँगस्टर पाहताना कंगनाच्या ओठांवर झालेली जखम पाहता येते. यांनतर तिने सर्जरी करून आपले ओठ पूर्ववत केले. 



श्रीदेवी : बॉलिवूडमध्ये आपले करिअर सुरू करताना श्रीदेवीला आपल्या नाकमुळे टीका सहन कराव्या लागल्या होत्या. सर्जरी करून श्रीदेवीने आपले नाक टोकदार बनविल्यावर तिने केलेल्या सर्जरीच्या बातम्या त्या काळी चांगल्याच चर्चेत होत्या. श्रीदेवीने केलेली प्लास्टिक सर्जरी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी गोष्ट आहे. आजही तिने केलेल्या सर्जरीचा आवर्जून उल्लेख केला जातो. या शिवाय ऐश्वर्या राय बच्चने देखील आपल्या ओठांची सर्जरी केली आहे.  कॅटरिना कैफने देखील आपल्या ओठांवर आणि नाकावर सर्जरी केली असल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: The experiments done by the actress to look beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.