Exclusive: व्वा!!! अहिलच्या भेटीला मामू जान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 19:22 IST2016-03-31T02:22:31+5:302016-03-30T19:22:31+5:30
आपला सल्लूमियां दुसºयांदा मामू झालाय. होय, त्याची लाडकी बहीण अर्पिता हिने आज बुधवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या ...
.jpg)
Exclusive: व्वा!!! अहिलच्या भेटीला मामू जान!
आ ला सल्लूमियां दुसºयांदा मामू झालाय. होय, त्याची लाडकी बहीण अर्पिता हिने आज बुधवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव अहिल ठेवण्यात आले आहे. अर्पिता आणि आयुष यांच्या अहिलला पाहण्यासाठी संपूर्ण खान कुटुंबीय रूग्णालयात आले. न्यू बेबीसोबतचा संपूर्ण खान-दानाचा फोटोही व्हायरल झाला. पण या फोटोमध्ये मामू जान कुठेच दिसत नव्हता. खुद्द, गोंडस बाळही मामू जानची प्रतीक्षा करीत असावे. शेवटी एकदा तो क्षण आलाच. डिअरेस्ट मामू जान, सलमान खान अहिलला पाहायला रूग्णालयात पोहोचला. अहिलचा पिता अर्थात आयुषने अगदी काही क्षणापूर्वी मामू जानसोबतचा अहिलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत सलमान गोंडस अहिलच्या कपाळाचे चुंबन घेत आहे. त्याच्या बाजूला बसलेली त्याची मॉम अर्पितासाठी यापेक्षा मोठा क्षण कुठला असेल?