Exclusive : विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा, अनुष्काकडून केले लग्नाच्या वृत्ताचे खंडन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 19:18 IST2017-12-06T13:39:04+5:302017-12-06T19:18:57+5:30

सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या लग्नानंतर माध्यमांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का ...

Exclusive: Virat-Anushka's marriage news rumors, disciplinary remarks by Anushka! | Exclusive : विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा, अनुष्काकडून केले लग्नाच्या वृत्ताचे खंडन!

Exclusive : विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा, अनुष्काकडून केले लग्नाच्या वृत्ताचे खंडन!

गरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या लग्नानंतर माध्यमांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या रंगत आहेत. हे दोघे येत्या ९, १० व ११ डिसेंबर रोजी इटली येथे विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु उपलब्ध माहितीनुसार दोघांच्या लग्नाच्या चर्चा निव्वळ अफवा असून, हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकणार नाहीत. काही दिवसांपूर्वी विराटने बीसीसीआयकडे श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेतून सुटी घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या सुटीचे कारण त्याने व्यक्तिगत असल्याचे म्हटले होते. तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि विराट सध्या विवाहाच्या बंधनात अडकणार नाहीत. दोघे लग्न करतील यात शंका नाही, परंतु सध्या दोघांच्याही परिवाराने लग्नाची तारीख निश्चित केलेली नाही. त्याचबरोबर असेही म्हटले जात होते की, अनुष्कासह दोघांचा परिवार इटलीकडे रवाना झाला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का मुंबईतच असून, ती तिच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर अनुष्काच्या प्रवक्त्यांनीदेखील या वृत्ताचे खंडन केले असून, या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 

ALSO READ विराट-अनुष्काच्या लग्नाचा डिसेंबरमध्येच उडणार बार; इटलीमध्ये बांधणार साताजन्माच्या गाठी?

काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का जहीर आणि सागरिकाच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी दोघांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. त्याचबरोबर असेही म्हटले जात होते की, दोघे लवकरच लग्न करणार आहेत. त्यातच विराटने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेतून विश्रांती घेतल्याने या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. असो, हे दोघे लग्न करणार हे जरी निश्चित असले तरी, आताच विवाहाच्या बंधनात अडकतील, असे दिसत नाही. 

अनुष्का आणि विराट गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. गेल्यावर्षीदेखील त्यांच्या लग्नाच्या बातमीने धूम उडवून दिली होती. परंतु ही अफवा असल्याचे नंतर समोर आले होते. आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार समोर येताना दिसत आहे. 

Web Title: Exclusive: Virat-Anushka's marriage news rumors, disciplinary remarks by Anushka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.