Exclusive : ही आहे करिना कपूर आणि सैफ अली खानच्या तैमूरची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:52 IST2016-12-22T16:26:00+5:302016-12-22T16:52:17+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या पहिल्या झलकची लोक आतुरतेने वाट पाहात होते. नुकतेच करिनाला रुग्णालयातून डिस्चार्ज ...

Exclusive: This is Kareena Kapoor and Saif Ali Khan's first glimpse of Timur | Exclusive : ही आहे करिना कपूर आणि सैफ अली खानच्या तैमूरची पहिली झलक

Exclusive : ही आहे करिना कपूर आणि सैफ अली खानच्या तैमूरची पहिली झलक

िना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या पहिल्या झलकची लोक आतुरतेने वाट पाहात होते. नुकतेच करिनाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. त्यावेळी सैफ आणि करिना मीडियासमोर आले आणि आपल्या मुलासोबत फोटोसाठी पोझेस दिल्या. करिना रुग्णालयातून बाहेर आल्यावर खूपच छान दिसत होती. या दोघांचे बाळ खूपच गोंडस असून त्याला एका कपड्यात गुंडाळण्यात आले होते.
खरे तर सेलिब्रेटी आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवतात. पण सैफ आणि करिनाने मुलाला सगळ्यांना दाखवून त्याचे फोटो काढण्याची परवानगीदेखील दिली. 
करिनाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 20 डिसेंबरला सकाळी साडे सात वाजता मुलाला जन्म दिला. सैफ आणि करिना आपल्या या बाळाचे नाव काय ठेवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. सैफ आणि करिनाने या मुलाचे नाव तैमूर ठेवले असून त्यांनीच हे नाव मीडियासोबत शेअर केले आहे. तैमूर हा एक निर्दयी राजा असल्याने त्याचे नाव सैफ आणि करिनाने मुलाला दिले आहे. यावरून सोशल मीडियामध्ये चांगलाच वाद रंगला होता. पण या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले. करिनाचे काका अभिनेता ऋषी कपूरने तर यावरून लोकांना सोशल मीडियावर चांगलेच सुनावले. 
करिना आणि सैफचे प्रेमप्रकरण कुरबान या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरू झाले. त्यांनी 16 ऑक्टोबर 2012ला अगदी जवळच्या नातलग आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. करिनाचे हे पहिले लग्न आहे तर सैफचा याआधी अभिनेत्री अमृता सिंगशी विवाह झाला होता. त्याला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. 

kareena kapoor saif ali khan baby

Web Title: Exclusive: This is Kareena Kapoor and Saif Ali Khan's first glimpse of Timur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.