Exclusive : आपल्या बायोपिकसाठी 'ही' अभिनेत्री आहे नीना गुप्तांची पहिली चॉईस

By गीतांजली | Updated: October 8, 2018 13:56 IST2018-10-08T13:16:08+5:302018-10-08T13:56:58+5:30

आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या आलिया भट्ट प्रत्येक दिग्दर्शिकाची पहिली पसंती आहे. सध्या आलिया कलंक सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Exclusive: This actress has Nina Gupta's first choice for her biopic | Exclusive : आपल्या बायोपिकसाठी 'ही' अभिनेत्री आहे नीना गुप्तांची पहिली चॉईस

Exclusive : आपल्या बायोपिकसाठी 'ही' अभिनेत्री आहे नीना गुप्तांची पहिली चॉईस

ठळक मुद्देनीना गुप्ता सध्या त्यांचा सिनेमा 'बधाई हो' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत'बधाई हो'मध्ये त्या आयुषमान खुराणाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत

आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या आलिया भट्ट प्रत्येक दिग्दर्शिकाची पहिली पसंती आहे. सध्या आलिया कलंक सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 'हम आपके है कौन'चा जर रिमेक बनला तर त्या आलियाने काम करावे अशी इच्छा माधुरी दीक्षितने व्यक्त केली होती. त्यातच आता ज्येष्ठ अभिनेत्री निना गुप्ता यांनी आपल्या आयुष्यावर जर सिनेमा तयार करण्यात आला तर त्या आपली भूमिका आलिया भट्टने साकारावी असे म्हटले आहे. सध्या नीना गुप्ता या त्यांचा आगामी सिनेमा 'बधाई हो' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान लोकमतशी बोलताना म्हणाल्या जर माझ्यावर बायोपिक आला तर त्यात आलियाने काम करावे. 


'बधाई हो' या सिनेमात नीना गुप्ता, आयुषमान खुराणा, सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. विनोदी धाटणीचा कौटुंबिक सिनेमा म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे. या सिनेमात आयुषमानची आई म्हणजेच नीना गुप्ता  गरोदर होतात. यावेळी त्याच्या कुटुंबाची कशी फजिती उडते आणि आयुषमानवर कसा शुभेच्छांचा वर्षाव होतो, याचे मजेदार किस्से या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. अमित रवींद्रनाथ शर्मा या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनित जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या ‘बधाई हो’ हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 
 

Web Title: Exclusive: This actress has Nina Gupta's first choice for her biopic