कधी बहीण-भाऊ तर कधी रोमांस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:18 IST2016-01-16T01:07:27+5:302016-02-06T08:18:37+5:30
'कपूर एंड संस' या आगामी चित्रपटात आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा विषयी चर्चा आहे की हे दोघेही बहीण-भावाच्या रोलमध्ये ...
.jpg)
कधी बहीण-भाऊ तर कधी रोमांस
' ;कपूर एंड संस' या आगामी चित्रपटात आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा विषयी चर्चा आहे की हे दोघेही बहीण-भावाच्या रोलमध्ये आहेत. मात्र आपल्या पहिल्या 'स्टूडेंट आफ द ईयर' चित्रपटात दोघेही रोमांस करताना दिसले होते. रोहित शेट्टीच्या 'बोल बच्चन' चित्रपटात असिनने ज्युनियर बच्चनच्या बहिणीचा रोल केला होता. 'आल ईज वेल' मध्ये मात्र दोघेही प्रणयदृश्य रंगवताना दिसले. 'गोलमाल रिटर्न'मध्ये तुषार कपूर आणि करिना कपूर बहीण-भाऊ बनले होते. मात्र तुषार कपूरच्या करिअरचा पहिला चित्रपट 'मुझे कुछ कहना है' आणि त्यानंतर 'जीना सिर्फ तेरे लिए' यात दोघेही नायक-नायिका झाले होते. शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉयचे उदाहरण आहे. मंसूर खानच्या दिग्दर्शनातील 'जोश'मध्ये दोघेही बहीण-भाऊ होते तर यशराजचा 'मोहब्बते' आणि बोनी कपूरच्या 'शक्ती'मध्ये दोघांचा रोमांटिक एंगल होता. याच यादीत दीपिका पदुकोण आणि जान अब्राहमचे नाव देखील आहे. अब्बास-मस्तानच्या 'रेस २' चित्रपटात दोघेही बहीण-भाऊ होते, तर 'देसी ब्वॉईज'मध्ये दोघेही जोडीदार होते. सलमान खान आणि नीलमने राजश्री प्रोडक्शनचा 'हम साथ साथ हैं' मध्ये बहीण भावाचा रोल केला होता, तर १९९२ मध्ये आलेल्या 'एक लड.का एक लड.की' मध्ये दोघेही नायक-नायिका होते. जुही चावला 'झंकार बीटस' मध्ये संजय सुरीची पत्नी आणि 'माय ब्रदर निखिल' मध्ये त्याची बहीण होती. १९८८ मध्ये बनलेला ओमप्रकाश यांचा चित्रपट 'अग्नी मध्ये मिथुन चक्रवर्ती आणि मंदाकिनी बहीण- भावाच्या रोलमध्ये होते, मात्र उमेश मेहराच्या 'जाल' आणि 'जीते हैं शान से' शिवाय डझनभर चित्रपटात ते प्रियकर-प्रेयसी झाले होते.