​कुणावर इतकी भडकली इलियाना डिक्रूज? काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 10:20 IST2017-08-21T04:49:59+5:302017-08-21T10:20:49+5:30

इलियाना डिक्रूज सध्या चांगलीच संतापली आहे आणि आपला हा संताप तिने टिष्ट्वटरवर बेधडकपणे बोलून दाखवला आहे. आता इलियानाला इतके ...

Euliana Dikruz is so excited? What is the reason? | ​कुणावर इतकी भडकली इलियाना डिक्रूज? काय आहे कारण?

​कुणावर इतकी भडकली इलियाना डिक्रूज? काय आहे कारण?

ियाना डिक्रूज सध्या चांगलीच संतापली आहे आणि आपला हा संताप तिने टिष्ट्वटरवर बेधडकपणे बोलून दाखवला आहे. आता इलियानाला इतके संतापायला काय झाले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर इलियानासोबत गैरवर्तन झाले. होय, एका चाहत्याने इलियानासोबत कथितरित्या छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मग काय, इलियानाला संताप येणे स्वाभाविक होते. आपल्या twitter अकाऊंटवर तिने दोन पोस्टद्वारे या संतापाला वाट मोकळी करून दिलीय.
 
आपण एका खराब जगात राहतोय. मला माहितीयं की, मी एक पब्लिक फिगर आहे.  मी खासगी आयुष्य जगू शकत नाही,’असे तिने पहिल्या tweetमध्ये म्हटले आहे. यानंतर दुसºया tweetमध्ये मात्र महिलांना खासगी मालमत्ता समजू पाहणा-यांना इलियानाने फैलावर घेतले आहे.
 
 
‘अर्थात पब्लिक फिगर आहे, याचा अर्थ कुणालाही माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा अधिकार आहे, असे मुळीच नाही. शेवटी मी एक महिला आहे,’ असे दुसरे tweet तिने केले आहे. अर्थात हे tweet करताना इलियानाने घटनेबद्दल माहिती दिलेली नाही.  यापूर्वीही अनेकदा इलियानाने छेडछाड करणा-यांविरूद्ध आवाज उठवला आहे. केवळ इलियानाच नाही तर विद्या बालन आणि स्वरा भास्कर यासारख्या अभिनेत्रींनीही चाहत्यांच्या गैरवर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 

ALSO READ : OMG !! इलियाना डिक्रूजची कुणी काढली छेड?

‘बर्फी’ या चित्रपटाद्वारे इलियानाने बॉलिवूड डेब्यू केला होता. अलीकडे इलियाना अर्जुन कपूर व अथिया शेट्टीसोबत ‘मुबारकां’ या चित्रपटात दिसली होती.  सध्या ती ‘बादशाहो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.  ‘बादशाहो’च्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान इलियानाचे हे टिष्ट्वट काहीसे धक्कादायक आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते, ते आम्हाला नक्की कळवा.
 

Web Title: Euliana Dikruz is so excited? What is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.