ईशा गुप्ताने दिली ‘बॅड न्यूज’; शेअर केली गर्भित पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:41 AM2018-11-28T11:41:32+5:302018-11-28T11:42:31+5:30

होय, ईशाने अलीकडे इन्स्टावर एक पोस्ट टाकली. तिची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे.

esha gupta and indian cricketer hardik pandya broke up actress shared an emotional post | ईशा गुप्ताने दिली ‘बॅड न्यूज’; शेअर केली गर्भित पोस्ट!!

ईशा गुप्ताने दिली ‘बॅड न्यूज’; शेअर केली गर्भित पोस्ट!!

googlenewsNext
ठळक मुद्दे तेही खूप काही सांगणारे आहे. ‘तुम्ही एखाद्याच्या भावना समजू शकत नसाल तर त्यात काहीही चुकीचे नाही. पण तुम्ही एक चांगला निर्णय घेऊ शकता. जेणेकरून समोरच्याला जाणवेल की, तुम्ही त्याची किमान चिंता करता,’असे ईशाने लिहिले आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे जुने नाते आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड ललनांच्या मनावर अधिराज्य केले. यापैकी अनेक नाती लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचलीत तर काही काळासोबत संपुष्टात आलीत. आजही हा ‘सिलसिला’ सुरू आहे. होय, भारतीय आॅलराऊंडर हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड नटी ईशा गुप्ता यांच्या डेटींगच्या बातम्या मध्यंतरी चर्चेत होत्या. पण ताजी खबर मानाल तर हार्दिक व ईशाचे ब्रेकअप झालेय.

खुद्द ईशाने सोशल मीडियावर पोस्ट टाकत, याचे संकेत दिले आहेत. होय, ईशाने अलीकडे इन्स्टावर एक पोस्ट टाकली. तिची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे. तिने लिहिलेय की, ‘वाईट बातमी ही आहे की, तुम्ही लोकांना एखादी गोष्ट आवडावी यासाठी बळजबरी करू शकत नाही. बळजबरीने ना प्रेम होत ना कुणी तुमच्यावर पे्रम करत. तुम्ही लोकांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. पण चांगली बातमी आहे आहे की, यामुळे काहीही फरक पडत नाही.’


या पोस्टला ईशाने गर्भित कॅप्शनही दिले आहे. तेही खूप काही सांगणारे आहे. ‘तुम्ही एखाद्याच्या भावना समजू शकत नसाल तर त्यात काहीही चुकीचे नाही. पण तुम्ही एक चांगला निर्णय घेऊ शकता. जेणेकरून समोरच्याला जाणवेल की, तुम्ही त्याची किमान चिंता करता,’असे ईशाने लिहिले आहे.
या पोस्टमध्ये ईशाने कुठलाही नामोल्लेख केलेला नाही. पण तिचा इशारा हार्दिक पांड्याकडे आहे, यात काहीही शंका नाही. आता हार्दिक पांड्या ईशाच्या या पोस्टवर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
हार्दिक पांड्याचे नाव ईशाआधी अभिनेत्री एली अबरामसोबत जोडले गेले होते. एकेकाळी दोघांचेही एकत्र फोटो व्हायरल होत. पण लवकरच दोघेही वेगळे झालेत. यानंतर हार्दिकच्या लाईफमध्ये ईशाने एन्ट्री घेतली होती.

Web Title: esha gupta and indian cricketer hardik pandya broke up actress shared an emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.