इशा देओलने केला हा दावा, या गोष्टी करा... तुम्हाला होणार नाही कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 16:11 IST2021-04-19T16:10:03+5:302021-04-19T16:11:15+5:30

अभिनेत्री इशा देओलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या गोष्टी केल्यास तुम्हाला कोरोना होणार नाही असा दावा या व्हिडिओद्वारे केला आहे.

Esha deol shares video on social media and claims it will help you to away from corona virus | इशा देओलने केला हा दावा, या गोष्टी करा... तुम्हाला होणार नाही कोरोना

इशा देओलने केला हा दावा, या गोष्टी करा... तुम्हाला होणार नाही कोरोना

ठळक मुद्देइशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याच व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

कोरोनाने देशात थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण असून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रत्येकजण घरात काही ना काही उपाय करताना दिसत आहे.

अभिनेत्री इशा देओलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या गोष्टी केल्यास तुम्हाला कोरोना होणार नाही असा दावा या व्हिडिओद्वारे केला आहे. इशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याच व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

इशाने या व्हिडिओद्वारे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले असून या व्हिडिओद्वारे ती सांगत आहे की, घरातच राहा उगाचच घराबाहेर पडू नका. ड जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहा... हे उपाय केल्यास तुम्हाला कोरोना होणार नाही.”

बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. तिने काहीच महिन्यांपूर्वी दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून बालसंगोपनावर तिने पुस्तक देखील लिहिले आहे. 

Web Title: Esha deol shares video on social media and claims it will help you to away from corona virus