घटस्फोटानंतर 'या' ठिकाणी शिफ्ट होणार Esha deol; लेकींसोबत पुन्हा सुरु करणार नव्याने आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:01 PM2024-02-07T13:01:11+5:302024-02-07T13:05:41+5:30

Esha Deol-Bharat Takhtani Separation: भरतचं घर सोडल्यानंतर आता ईशा नेमकी कुठे राहणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

esha-deol-live-mother-hema-malini-hunglow-after-sepration-with-bharat-takhtani | घटस्फोटानंतर 'या' ठिकाणी शिफ्ट होणार Esha deol; लेकींसोबत पुन्हा सुरु करणार नव्याने आयुष्य

घटस्फोटानंतर 'या' ठिकाणी शिफ्ट होणार Esha deol; लेकींसोबत पुन्हा सुरु करणार नव्याने आयुष्य

कलाविश्वात सध्या अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) हिच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगली आहे. जवळपास १२ वर्ष संसार केल्यानंतर ईशाने पती भरत तख्तानीसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या सगळीकडे ईशा आणि भरत याच जोडीची (Esha Deol-Bharat Takhtani Separation) चर्चा रंगली आहे. यामध्येच आता कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर ईशा नेमकी कुठे राहणार? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

धर्मेंद्र (dharmendra) आणि हेमा मालिनीची (hema malini) लेक हिने नुकतीच तिच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. 'दिल्ली टाइम्स'च्या वृत्तानुसार, ईशा आणि भरत (Bharat Takhtani) या दोघांनी राध्या आणि मिराया या लेकींच्या भविष्याचा विचार करता विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  एकमेकांच्या प्रेमात  पडून लग्नगाठ बांधणाऱ्या या जोडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मतभेद निर्माण होत होते. त्यामुळे यी जोडीने कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला. परंतु, घटस्फोट घेतल्यानंतर ईशा तिच्या लेकींसोबत कुठे राहणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

घटस्फोटानंतर कुठे राहणार ईशा?

ईशा घटस्फोटापूर्वी तिच्या दोन लेकींसोबत बांद्रा येथे रहात होती. मात्र, आता ती कुठे राहणार हा मोठा प्रश्न आहे. E24 च्या माहितीनुसार, ईशा घटस्फोनंतर तिच्या दोन लेकींसह तिच्या आईच्या घरी  राहणार आहे. हेमा मालिनी यांच्या जुहू  येथील बंगल्यामध्ये ईशा तिच्या लेकींसह शिफ्ट होणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर भरत आणि ईशा यांच्या नात्यात दुरावा आला. लेकीचा जन्म झाल्यानंतर भरतच्या आयुष्यातलं माझं स्थान कमी झालंय याची जाणीव सतत होऊ लागली होती, असं स्पष्टीकरण ईशाने तिच्या घटस्फोटावर दिलं. भरतच्या या बदललेल्या स्वभावाविषयी ईशाने तिच्या अम्मा मिया या पुस्तकातही उल्लेख केला आहे.

Web Title: esha-deol-live-mother-hema-malini-hunglow-after-sepration-with-bharat-takhtani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.