'रामायणा’वर येणार इंग्रजी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 09:52 IST2016-03-12T16:52:56+5:302016-03-12T09:52:56+5:30

आतापर्यंत टीव्ही, नाटक, चित्रपट, रेडिओ आणि अ‍ॅनिमेशनद्वारे वर्षानुवर्षांपासून ‘रामायणा’ची गोष्ट सांगण्यात आली आहे. परंतु आजही रामायणावर आधारित भव्यदिव्य चित्रपट ...

English films coming to Ramayana | 'रामायणा’वर येणार इंग्रजी चित्रपट

'रामायणा’वर येणार इंग्रजी चित्रपट

ापर्यंत टीव्ही, नाटक, चित्रपट, रेडिओ आणि अ‍ॅनिमेशनद्वारे वर्षानुवर्षांपासून ‘रामायणा’ची गोष्ट सांगण्यात आली आहे. परंतु आजही रामायणावर आधारित भव्यदिव्य चित्रपट तयार झालेला नाही. म्हणूनच जगभरातील प्रेक्षकांना रामायणाची ओळख करून देण्यासाठी आता तीन तरुण फिल्ममेकर्सने रामायणावर इंग्रजी भाषेतून बिग बजेट चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक विनीत सिन्हा, शॉन ग्राहम आणि रॉनी आॅलमन असे या फिल्ममेकर्सचे नावे आहेत. त्यांच्या मते, भारतीय पुराणातील कथा जगासमोर मांडणाची खूप गरज आहे.

अद्यायवत तंत्रज्ञान वापरून हॉलिवूड बिग बजेट चित्रपटांच्या तुल्यबळ सिनेमा ‘रामायणा’वर काढण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा मानस तिघांनी व्यक्त केला आहे.

हॉलिवूड, चीन, जपान देशांमध्ये ज्याप्रमाणे त्यांच्या पौराणिक कथा चित्रपटांतून भव्यदिव्यपणे सादर करतात, तसे भारतामध्ये होताना दिसत नाही, असे विनीत म्हणाले.

ramayana

रामायणावर आधारित आमचा सिनेमात ३डी आणि आयमॅक्स तंत्रज्ञान वापरणार असल्याची माहिती शॉन ग्राहमने दिली. भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट बनविण्यासाठी 2.5 कोटी डॉलर्स एवढा खर्च आलेला आहे.

आमच्या चित्रपटासाठी त्यापेक्षा दुप्पट खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मोठ्या स्टुडियोजनी आम्हाला मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली.

Web Title: English films coming to Ramayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.