आजारी मुलांना इम्रान करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:13 IST2016-01-16T01:19:22+5:302016-02-08T06:13:32+5:30

सिरीयल किसर म्हणून ओळख असलेला इम्रान हाश्मी सध्या काही समाजासाठीही कामे करू इछितो आहे. नुकताच तो 'इंडीयन असोसिएशन ऑफ पेडीएट्रीक ...

Emran helps the sick children | आजारी मुलांना इम्रान करणार मदत

आजारी मुलांना इम्रान करणार मदत

रीयल किसर म्हणून ओळख असलेला इम्रान हाश्मी सध्या काही समाजासाठीही कामे करू इछितो आहे.

नुकताच तो 'इंडीयन असोसिएशन ऑफ पेडीएट्रीक सर्जन' या संस्थेच्या एका परिषदेत सहभागी झाला. आजारी मुलांना मदत करण्यासाठी ही संस्था कार्य करते.

emraan hashmi

या परिषदेत एका मुलाचा 'वडील' या नात्याने इम्रानला आमंत्रित करण्यात आले होते. मागच्या वर्षी इम्रानचा मुलगा 'अयान' वर एक मोठी शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे ते दु:ख त्याने जवळून पाहिले. अशा परिस्थितीवर पुस्तक लिहिण्याची घोषणाही इम्रानने केली होती.

आता अयानच्या तब्येतीत सुधारणा असून, अशा कॅन्सर किंवा अन्य दुर्धर आजाराने ग्रासलेल्या मुलांसाठी ही संस्था वरदान ठरू शकते, अशी प्रतिक्रिया इम्रानने दिली.

emraan hashmi


 

Web Title: Emran helps the sick children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.