बापरे ही तीच सुंदर अभिनेत्री आहे? 'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:34 PM2022-07-11T12:34:16+5:302022-07-11T12:34:46+5:30

Udita goswami: सध्या सोशल मीडियावर उदिताचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधून तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे.

emraan hashmi heroine udita goswami in film aksar latest photo viral | बापरे ही तीच सुंदर अभिनेत्री आहे? 'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क

बापरे ही तीच सुंदर अभिनेत्री आहे? 'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क

googlenewsNext

अभिनयापेक्षा बोल्डनेसमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे उदिता गोस्वामी (Udita Goswami). उदिता फार मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली. मात्र, कमी चित्रपट करुनही तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळावलं. जहर आणि अक्सर या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. एकेकाळी बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या उदितामध्ये आता कमालीचा बदल झाला असून तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर उदिताचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधून तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे. उदिताचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. यात अनेकदा ती तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले मात्र, या फोटोमध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचा लूक पूर्णपणे चेंज झाला आहे.

दरम्यान, उदिताचे हे फोटो पाहिल्यावर नेटकरी थक्क झाले आहेत. त्यामुळे 'एकेकाळी सुंदर दिसणारी अभिनेत्री हिच का?' असा प्रश्न अनेक युजर्सने विचारला आहे. डेहराडूनमध्ये लहानाची मोठी झालेली उदिता एक मॉडेलदेखील आहे. उदिता तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आली. दिग्दर्शक मोहित सुरीसोबतचं तिचं अफेअर विशेष गाजलं. या दोघांनी २०१३ मध्ये लग्न केलं.

Web Title: emraan hashmi heroine udita goswami in film aksar latest photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.