ऐश्वर्या रायच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन यांनी लिहिला भावूक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:40 IST2017-03-19T13:10:13+5:302017-03-19T18:40:13+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचे वडील कृष्णराज राय यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी संदेश लिहिला आहे.  अमिताभ यांची ...

Emotional message written by Amitabh Bachchan after the death of Aishwarya Rai's father | ऐश्वर्या रायच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन यांनी लिहिला भावूक संदेश

ऐश्वर्या रायच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन यांनी लिहिला भावूक संदेश

िनेत्री ऐश्वर्या रॉय यांचे वडील कृष्णराज राय यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी संदेश लिहिला आहे. 
अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. त्यावर अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले. ‘मृत्यूचा एकच अंत असतो....आणि त्याला परिभाषित करता येत नाही.’ ऐश्वर्याचे वडील लिम्फोमाने आजारी होते. गेली अनेक दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जात होते. काही आठवड्यांपूर्वीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 


अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे, ‘मृत्यूचा संदेश प्रत्येकाला येतोच... आणि जाणाºयांची आठवण आमच्या मनात राहते’. जीवनाचे अंतिम सत्य आणि शेवटच्या स्थितीचे दु:ख आहे. याचे रितीरिवाज, परंपरा, दु:खाच्या क्षणी सांत्वनेसाठी येणारे लोक, अंतिम संस्कार... काय म्हणू, काय करू’ आपल्या ब्लॉगच्या शेवटी ते लिहितात ‘यात सर्वात सुखी जाणारा व्यक्ती असतो. कारण तो स्वर्गात शांती अनुभवू शकतो.’
ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तातडीने लिलावती रूग्णालयात धाव घेतली होती.

Web Title: Emotional message written by Amitabh Bachchan after the death of Aishwarya Rai's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.