/>चित्रपटसृष्टीत काम करता करता वर्षे भरकन् निघून गेली. तीन दशकांपेक्षा अधिक काळ निघून गेला. मात्र या कारकिर्दीत आव्हानात्मक भूमिका माझ्या वाट्याला फार कमी आल्या. माझ्या वाट्याला कायम मी करू न इच्छिणाºया लहान-सहान भूमिका आल्या...ही खंत आहे बॉलिवूड अभिनेत्री दीप्ती नवल यांची. दीप्ती यांना अलीकडे ‘एनएच १०’साठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराच्या पुरस्कारने गौरविण्यात आले. यानिमित्ताने दीप्ती भरभरून बोलल्या. मी खलनायिकेच्या भूमिकेसाठी आधी राजी नव्हते. पण मी ते केले आणि मला ते आवडू लागले. मी प्रत्येक तºहेची भूमिका साकारण्यात तयार आहे, असे मला आताश: वाटू लागले आहे. कारण इतकी वर्षे काम केल्यानंतरही माझी अभिनयाची भूक शांत करू शकेल, अशा भूमिका मला मिळालेल्या नाहीत. मी आयुष्यात अनेक क्षेत्रात प्रयत्न केले. चित्रकला, अभनय, लेखन. पण संगीत शिकण्याची एक इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. यालाही मीच जबाबदार आहे. मी कायम अभिनयास प्राधान्य दिले आणि संगीत शिकण्याची सुप्त इच्छा दाबून टाकली. या वळणावर ही इच्छा पुन्हा डोके वर काढते आहे...असे दीप्ती म्हणाल्या.