एकता कपूरने हा फोटो शेअर करताच सुरु झाली लग्नाची चर्चा, कोण आहे हा ‘हँडसम मुंडा’?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 10:32 AM2020-12-16T10:32:12+5:302020-12-16T10:33:31+5:30

‘... आणि आम्ही इथे आहोत, लवकरच तुम्हाला सांगू,’ असे कॅप्शन एकताने या फोटोला दिले आहे.

is ekta kapoor going to marry with this handsome boy tanveer bookwala | एकता कपूरने हा फोटो शेअर करताच सुरु झाली लग्नाची चर्चा, कोण आहे हा ‘हँडसम मुंडा’?

एकता कपूरने हा फोटो शेअर करताच सुरु झाली लग्नाची चर्चा, कोण आहे हा ‘हँडसम मुंडा’?

googlenewsNext
ठळक मुद्दे वयाच्या 19 व्या वर्षी एकताने करिअरची सुरुवात केली.  आई शोभा कपूरसोबत मिळून तिने बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली.

टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरने आपल्या सोशल अकाऊंटवर एका हँडसम पुरूषाचा फोटो शेअर केला आणि इंटरनेटच्या जगात खळबळ माजली. कँडिड मूडमधील हा फोटो पाहून चर्चा होणार नाही ते नवल. एकताने हा फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. इतकेच नाही, एकतासोबतच्या या हँडसम पुरूषानेही अशी काही कमेंट केली की, त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. एकताचा हा फोटो तूर्तास सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

‘... आणि आम्ही इथे आहोत, लवकरच तुम्हाला सांगू,’ असे कॅप्शन एकताने या फोटोला दिले आहे. एकता कपूर एका मुलाची आई आहे. मात्र अद्याप अविवाहित आहे. 45 वर्षाच्या एकताने सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला होता.

कोण आहे हा हँडसम मुंडा?
एकतासोबतचा हा हँडसम मुंडा कोण, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे नाव आहे तनवीर बुकवाला. तनवीर हा एकताचा खूप चांगला मित्र आहे. याच आपल्या बेस्ट फ्रेन्डसोबत एकताने फोटो शेअर केलाय. या फोटोवर तनवीरने अशी काही कमेंट केली की, हे कपल लवकरच लग्न करणार असा अंदाज बांधला गेला. ‘या मैत्रीला नात्यात बदलण्याची वेळ आलीये,’ अशी कमेंट तनवीरने केली आहे. त्याची कमेंट तुम्ही खाली पाहू शकता.

तनवीरने आपल्या सोशल अकाऊंटवरही एकता कपूरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहे. एका फोटोत तो एकता, शिवाय तिची आई शोभा कपूर व मनीष मल्होत्रासोबत दिसतोय.

7 जून 1979 रोजी अभिनेते जितेन्द्र आणि शोभा कपूर यांच्या पोटी जन्मलेली एकता एकदिवस बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाईल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. पण आज एकता केवळ टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन नाही तर टेलिव्हीजनपासून सिनेसृष्टीत काम करणाºया अनेक कलाकारांची गॉड मदरही आहे.

विद्या बालन, सुशांत सिंग राजपूत या कलाकारांना एकताने ब्रेक दिला होता. वयाच्या 19 व्या वर्षी एकताने करिअरची सुरुवात केली.  आई शोभा कपूरसोबत मिळून तिने बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली. इतक्या वर्षांत दोघी मिळून बालाजीचे साम्राज्य सांभाळत आहेत.   

एकताने टीव्हीवर सास-बहू ड्रामा आणला. शिवाय त्यात बोल्ड कंटेंट आणून एक धाडसी पाऊल उचलले.  चित्रपटातील बोल्ड सीन्ससाठी अ‍ॅक्टर्सचा नकार टाळण्यासाठी आणि सेन्सॉरच्या कात्रीतून वाचण्यासाठी एकताने काय करावे, तर अ‍ॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये न्यूडिटी क्लॉज टाकला. ट्रिपल एक्ससोबत तिने हा क्लॉज आणला. तिच्या या क्लॉजवर बरीच टीका झाली.

Web Title: is ekta kapoor going to marry with this handsome boy tanveer bookwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.