​सन २०१९ची ‘ईद’ही ‘भाईजान’ सलमान खानच्या नावावर बुक! रिलीज होणार ‘हा’ चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 11:59 IST2017-10-24T06:29:19+5:302017-10-24T11:59:19+5:30

तुम्ही ‘भाईजान’सलमान खानचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, प्रतीक्षा संपलीय आणि सलमान खानचा पुढचा चित्रपट ‘भारत’ ...

'Eid' of 2019 book 'Beyazan' in the name of Salman Khan! 'Haa' movie to be released! | ​सन २०१९ची ‘ईद’ही ‘भाईजान’ सलमान खानच्या नावावर बुक! रिलीज होणार ‘हा’ चित्रपट!!

​सन २०१९ची ‘ईद’ही ‘भाईजान’ सलमान खानच्या नावावर बुक! रिलीज होणार ‘हा’ चित्रपट!!

म्ही ‘भाईजान’सलमान खानचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, प्रतीक्षा संपलीय आणि सलमान खानचा पुढचा चित्रपट ‘भारत’ कधी रिलीज होणार, ते स्पष्ट झाले आहे. भाईजानने या चित्रपटाच्या रिलीजसाठीही नेहमीप्रमाणे ईदचे मुहूर्त निवडले आहे. २०१९ च्या ईदला सलमानचा ‘भारत’ हा सिनेमा रिलीज होईल. हा चित्रपट ‘Ode To My Father’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोलले जात आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षी एप्रिलमध्ये ‘भारत’चे शूटींग सुरु होईल. या शूटींगची पूर्वतयारी सध्या सुरु आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा चित्रपट रखडत चालला होता. सर्वप्रथम हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुलला वाटत होते. संतोषी यांनी ‘घायल’,‘घातक’,‘दामिनी’,‘अजब प्रेम की गजब कहानी’ असे काही हिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे अतुल आणि सलमान दोघांनाही ‘भारत’साठी तेच हवे होते. पण संतोषींनी सलमानला बरीच प्रतीक्षा करवली. अखेर सलमाननेच आपली वाट बदलवून हा प्रोजेक्ट त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरकडे सोपवला. तूर्तास सलमान आणि अली अब्बास जफर दोघेही ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहेत. सलमानचा सुपरडुपर हिट ‘सुल्तान’ हा चित्रपटही अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता.

ALSO READ: ​सलमान खानने मागितली जगातील सर्व कुत्र्यांची माफी; पण का?

खरे तर ‘भारत’च्या दिग्दर्शनासाठी अली अब्बास जफरही राजी नव्हता. पण सलमानने गळ घातल्यावर त्याचा नाईलाज झाला. शेवटी भाईची गोष्ट तो टाळू शकणार नव्हताच.  सलमान हा अतुल अग्निहोत्रीचा मेव्हणा आहे. अतुलने याआधी सलमानसोबत ‘बॉडीगार्ड’ बनवला होता. हा चित्रपटही हिट ठरला होता. आता ‘भारत’ हा अतुलचा सलमानसोबतचा दुसरा चित्रपट असणार आहे. ‘भारत’ची हिरोईन कोण असणार, हे अद्याप फायनल झालेले नाही. पण चर्चा खरी मानाल तर कॅटरिना कैफच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता कॅटरिना कैफचं का? हे तुम्हाला कळले असेलच.  

Web Title: 'Eid' of 2019 book 'Beyazan' in the name of Salman Khan! 'Haa' movie to be released!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.