आजारपणामुळे समांथा बॉलिवूडच्या बिग बजेट प्रोजेक्टला करणार रामराम?, सत्य आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 20:29 IST2022-12-21T20:29:28+5:302022-12-21T20:29:52+5:30
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

आजारपणामुळे समांथा बॉलिवूडच्या बिग बजेट प्रोजेक्टला करणार रामराम?, सत्य आलं समोर
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. समांथाला ‘मायोसिटिस’ या ऑटोइम्युन आजाराचे निदान झाले आहे. दरम्यान आता समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या तब्येतीविषयी अपडेट दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समांथा आजारपणामुळे अभिनयाला रामराम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच तिने आगामी प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याचेही म्हटले होते. आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत सत्य सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथा अजूनही राज आणि डीकेच्या 'सिटाडेल'मध्ये काम करत आहे. मायोसिटिसमुळे समांथा कामातून ब्रेक घेत नाही. यापूर्वी अशी बातमी आली होती की, जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत ती चित्रपटात काम करणार नाही. मात्र, हे खरे नाही.
समांथा रुथ प्रभू अजूनही बॉलिवूड प्रोजेक्ट सिटाडेलचा एक भाग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथा चित्रपटातून बाहेर पडलेली नाही. तिने जानेवारीच्या तारखा दिल्या आहेत. मात्र तिची उपलब्धता आणि तब्येत लक्षात घेऊन अधिकृत शूटिंगच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
वर्कफ्रंटबद्दल...
समांथाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिचा लवकरच 'शाकुंतलम' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक पौराणिक चित्रपट असून यात अल्लू आरा, मोहन बाबू आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. तसेच ती अभिनेता विजय देवरकोंडसोबत 'कुशी' या चित्रपटात दिसणार आहे.