तर 'या' कारणामुळे फन्ने खानमधून आर. माधवन झाला बाहेर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:09 IST2017-09-12T08:38:14+5:302017-09-12T14:09:03+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर स्टारर फन्ने खानमध्ये आर. माधवन दिसणार असल्याची चर्चा होती मात्र अचानक नंतर आर.माधवनच्या ...

But due to 'this', R. Madhavan out? | तर 'या' कारणामुळे फन्ने खानमधून आर. माधवन झाला बाहेर ?

तर 'या' कारणामुळे फन्ने खानमधून आर. माधवन झाला बाहेर ?

्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर स्टारर फन्ने खानमध्ये आर. माधवन दिसणार असल्याची चर्चा होती मात्र अचानक नंतर आर.माधवनच्या जागी राजकुमार रावला घेण्यात आले. आर. माधवन आणि ऐश्वर्याचा रोमांस पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक होते मात्र माधनची जागा राजकुमारने घेतल्यामुळे त्याचे फॅन्स जरुर नाराज झाले असतील. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्जर्शित या चित्रपट आर. माधवनला काढून राजकुमार रावला का घेतले या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांच हवे आहे. डीएनएमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार आर. माधवनला या चित्रपटासाठी केवळ 15 दिवस शूट करायचे होते मात्र यासाठी त्यांने 1. 5 कोटी मागितले. याच दरम्यान राजकुमार राव हीच भूमिका साकारण्यासाठी कमी मानधनात तयार झाला. त्यामुळे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी राजकुमारची निवड केली. चित्रपटाची निर्माती  प्रेरणा अरोराने राजकुमार रावला त्याची निवड झाली माहिती फोनवरुन दिली होती. राजकुमार तेव्हा वेबसीरिज बोसच्या शूटिंगसाठी पोलांडला होता. आता चित्रपटात ऐश्वर्यासोबत रोमांस करताना राजकुमार राव दिसणार आहे. आर. माधवनसह या भूमिकेसाठी अक्षय ओबेरॉय आणि कार्तिक आर्यन यांच्या नावाचा सुद्धा विचारण्यात आला होता. हा चित्रपट 2000 साली आलेल्या व्हेरिबडी फेमसचा रिमेक आहे.  मध्यंतरी ऐश्वर्याने आपल्या पेक्षा जास्त वयाच्या कलाकारासोबत काम करायला नकार दिल्याने माधवनसा या चित्रपटातून डच्चू देण्यात आल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. मात्र डिएनएमध्ये आलेल्या रिपोर्टचा विचार केला तर जास्त मानधनामुळे त्याच्या हातून हा चित्रपट गेल्याचे कळते आहे. 

ALSO READ : FIRST LOOK : ​ सलग पाच दिवस, पन्नास तास! ‘फन्ने खान’साठी अनिल कपूरने घेतली अशी मेहनत!!

फन्ने खानची शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरु झाली आहे. यात ऐश्वर्या आपल्या पेक्षा वयाने 10 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमांस करणार आहे. नुकताच अनिल कपूरचा या चित्रपटातील लूकमध्ये आऊट करण्यात आला होता. तब्बल 17 वर्षानंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'हमारा दिल आपके पास' हा दोघांचा चित्रपट हिट गेला होता. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: But due to 'this', R. Madhavan out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.