नकारात्मक चित्रण केल्याने ‘गीता-बबिता’चे खरे कोच नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 06:25 PM2016-12-28T18:25:12+5:302016-12-28T18:25:12+5:30

दंगल चित्रपटाने गेल्या पाच दिवसात १०० कोटीहून अधिकचा व्यवसाय केला असला तरी एक व्यक्ती मात्र या चित्रपटाबाबत नाराज आहे. ...

Due to negative portrayals, the true coach of Geeta Babita is upset | नकारात्मक चित्रण केल्याने ‘गीता-बबिता’चे खरे कोच नाराज

नकारात्मक चित्रण केल्याने ‘गीता-बबिता’चे खरे कोच नाराज

googlenewsNext
गल चित्रपटाने गेल्या पाच दिवसात १०० कोटीहून अधिकचा व्यवसाय केला असला तरी एक व्यक्ती मात्र या चित्रपटाबाबत नाराज आहे. ती व्यक्ती म्हणजे गीता-बबिता यांचे खरे कुस्ती प्रशिक्षक प्यारा राम सोंधी. त्यांच्या अनुसार या चित्रपटात प्रशिक्षकाबाबत नकारात्मक चित्रण केल्याने त्यांना धक्का बसलाय. बºयाचशा गोष्टी चुकीच्या दाखविण्यात आल्याने ते संतापले आहेत.
२०१० साली  भारताला राष्टÑकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारी गीता फोगाट आणि तिचे वडील महावीरसिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे संपूर्ण देशभर कौतुक होत आहे. आमिर खान यांच्या दंगल चित्रपटात दाखविण्यात आल्याप्रमाणे खरे प्रशिक्षक तसे नाहीत. या चित्रपटाने माझी कारकीर्द खराब झाल्याचे राम प्यारे यांचे म्हणणे आहे. या चित्रपटात सोंधी यांचे नाव बदलण्यात आले असून, ते पी. आर. कदम असे ठेवण्यात आले आहे. 
या चित्रपटात महावीर फोगाट यांचे राष्टÑीय प्रशिक्षकांसोबत वारंवार खटके उडत असतात. त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीबाबत महावीर हे नाराज असतात. त्यामुळे ते स्वत: आपल्या मुलींना प्रशिक्षण देतात. या चित्रपटात प्रशिक्षकास नकारात्मक भूमिकेत दाखविण्यात आले असून, अंतिम सामन्यादरम्यान महावीरसिंग फोगाट यांना एका खोलीत कोंडून ठेवले जाते आणि ते आपल्या मुलींचा अंतिम सामना पाहू शकत नाहीत, असे दर्शविले आहे.



प्यारा राम सोंधी यांच्या अनुसार महावीरसिंग फोगाट हे अत्यंत सज्जन व्यक्ती असून, त्यांना खोलीत कोंडून ठेवण्याची गोष्ट चुकीची आहे. राष्टÑीय शिबिरादरम्यान महावीरसिंग यांनी कधीही दखल दिली नाही. गीता आणि प्रशिक्षकादरम्यान असलेले वाद निरर्थक आहेत. प्रशिक्षणादरम्यान गीता आणि बबिता यांनी कोणताही चित्रपट बाहेर जाऊन पाहिला नाही. गीता आणि बबिता यांच्या सामन्यादरम्यान ते कुठे बसलेले आहेत, हे मला माहिती देखील नव्हते, असेही सोंधी म्हणाले. मी ज्यावेळी हा चित्रपट पाहिन त्यावेळी कुस्ती महासंघाशी बोलणार आहे, त्याचपद्धतीने आमिर खानकडेही स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
दंगल या चित्रपटात आमिर खानला प्रशिक्षण देणारे कृपाशंकर बिष्णोई हे माझे विद्यार्थी आहेत. आम्ही ज्यावेळी यापूर्वी भेटलो होतो, त्यावेळी आमिर खानने मला काही प्रश्न विचारले होते. या चित्रपटाविषयी आमचे काहीही बोलणे झालेले नव्हते. प्रशिक्षकाची भूमिका कशापद्धतीची असणार आहे, याबाबत त्यांनी मला सांगावयास हवे होते, असेही सोंधी यांनी म्हटले.




Web Title: Due to negative portrayals, the true coach of Geeta Babita is upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.